Published On : Wed, Nov 13th, 2019

श्री कृष्णा रेस्टारेंट मध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित करणाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

कामठी : स्थानिक जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वारीसपुरा रहिवासी दोन अल्पवयीन मुला मुलींमध्ये असलेल्या प्रेमप्रकरणाची कुणकुण घरमंडळींना कळताच मुलीच्या आई वडिलांनि हे प्रेमप्रकरण विवाहबंधनात अडकावे यासाठी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला असता मुलांकडून या प्रस्तावाला विरोध दर्शवित लग्न करण्यास नकार दिला यावरून मुलाने पीडित मुलीला प्रेम प्रकरणात अडकवून विवाह करणार असल्याचा विश्वास देऊन संधी साधून मागील दोन वर्षपासून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून अनैतिक अत्याचार केला यावरून पीडित मुलीने स्थानिक जुनी कामठी पोलिस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी 17 वर्षीय अल्पवयिन मुला विरुद्ध भादवी कलम 376 , बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 2012 अनव्ये गुन्हा नोंदवीत आरोपीस ताब्यात घेण्यात आले.

सदर आरोपी हा पीडित फिर्यादी मुलीच्या घराजवळ राहत असून दोन्ही जवळपास 17 वर्षाचे आहेत मागील दोन वर्षांपासून या दोघात प्रेम संबंध असून लग्न करण्याचे सुद्धा नियोजित होते यानुसार हे दोघेही मनमोकळे पणाने वाटेल त्या ठिकानी कुणाचीही भीती न बाळगता मनसोक्त व्हायचे दरम्यान बहुधा नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कळमना रोड वरील सिंधी कॉलोनी येथील श्री कृष्णा रेस्टरेंट मध्ये जोडपयांसाठी पर्याप्त असलेली शरीरसुखाची सोय असलेल्या ठिकाणी शरीरसंबंध प्रस्थापीत करीत होते.या प्रेम प्रकरणाची कुणकुण मुलीच्या घरी लागताच मुलीच्या घरमंडळींनि आरोपी मुलाकडे लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला यावर आरोपी मुलाने या लग्नास स्पष्ट नकार दिल्याने प्रेमात अडकलेल्या मुलीका आपली फसगत होऊन प्रेमाच्या नावाखाली अब्रूनुकसानही झाल्याचे लक्षात येताच त्वरित जुनी कामठी पोलीस स्टेशन गाठून सदर प्रियकरा विरोधात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसानी गुन्हा नोंदवीत ताब्यात ठेवण्यात आले.

बॉक्स:- हॉटेल च्या आड अवैधरित्या देह व्यवसाय करणाऱ्या हॉटेल चालकावर अजूनही गुन्हा नोंद नाही….

कामठी कळमना मार्गावरील सिंधी कॉलोनी मध्ये असलेल्या श्री कृष्णा रेस्टरेंट मध्ये जोडपयांसाठी मनसोक्त बसण्याची सोय असल्याने याकडे जोडप्यांचा कल अधिकच वाढला होता त्यातच जोडप्यांचा वाढता कल लक्षात घेता या हॉटेल च्या आड जोडप्याना शारीरिक संबंध प्रस्थापित करता यावे यासाठी पर्यायी सोय सुद्धा करून देत असल्याची गुप्त माहिती आहे ज्याची प्रचिती पीडित फिर्यादी मुलीने सदर प्रकरणात दिलेल्या तक्रारीतुन दिसून येते.

कारण याच हॉटेल मध्ये बहुधा वेळी शारिरिक संबंध प्रस्थापित केल्याचे नमूद आहे तेव्हा पोलिसानी सुद्धा केलेल्या पंचनामा चौकशीत सुद्धा अवैधरित्या सोय करून देत असल्याचे लक्षात आलेले आहे तरीसुद्धा या हॉटेल चालक मालकावर अजूनही गुन्हा नोंदविण्यात आला नसल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर शंकेची सुई जोर धरत आहे तसेच पोलिसांना सुद्धा लागलेल्या या व्यवसायाच्या कुंनकूनेतून तीन दिवसांपूर्वी याच हॉटेल वर पोलिसानी धाड घातली मात्र झालेल्या तडजोडीतून धाड ही नामधारी ठरवीत ‘तेरी भी चूप..मेरी भी चूप ‘ अशी भूमिका बजावण्यात आल्याच चर्चा आहे…तेव्हा ते पोलीस कोणते होते… यात अजूनही गुप्त रहस्य कायम आहे..