| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, May 30th, 2017

  डॉक्टर म्हणवून घेणाऱ्या माथेफिरूवर मनपा करणार कारवाई

  NMC Nagpur

  नागपूर: मी डॉक्टर आहे आणि मी कन्यारत्न समिती नावाची संस्था चालवतो. लॅपटॉपद्वारे गर्भलिंग तपासून जर कन्या असेल तर तिचे आम्हीच संगोपन करतो, अशी भूरळ घालणाऱ्या आणि स्वतःला डॉक्टर म्हणवून घेणाऱ्या माथेफिरूवर महानगरपालिकेच्या गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व लिंग निदान समितीच्या वतीने कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. साई मंदिर वर्धा रोड परिसरात हा इसम रहात असून नागरिकांनी त्याच्या प्रलोभनाला बळी पडू नये असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.

  नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे या इसमाच्या वारंवार तक्रारी येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर समितीने कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. गर्भलिंग निदान करण्याचे पत्रक त्याने छापले असल्य़ाने त्यावर कलम २३ अंतर्गत कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले असून हा माथेफिरू पूर्ण नसल्याने त्याला मनोरूगण्यालयात भरती करता येत नसल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे. हा व्यक्ती जनतेची दिशाभूल करत असून हे कायद्याचे उल्लंघन आहे. त्याद्वारे त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नोडल अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे यांनी केलेली आहे. यावेळी डॉ.विनय टुले, डॉ. वर्षा ढवळे, ॲड वैशाली वाघमारे, लक्ष्मीनगर झोनचे स्वास्थ निरीक्षक आर. एम. तिडके, विणा खानोरकर आदी उपस्थित होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145