नागपूर – नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना २२ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी २५ वर्षीय रविंद्र मानिक भोयर या आरोपीला अवघ्या २४ तासांत अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत लज्जास्पद वर्तन करत तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. या प्रकरणात नवीन कामठी पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ३५४, ३५४(अ)(२), ३५४(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची गंभीरता लक्षात घेता वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आढावें यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत आरोपीचा शोध घेतला. आरोपीस २३ एप्रिल रोजी अटक करण्यात आली असून त्याला २४ तासांत न्यायालयात हजर केले असता, प्रथम वर्ग न्यायालयाने ५,००० रुपयांच्या जामिनावर सोडण्याचे आदेश दिले.ही कामगिरी पोलीस निरीक्षक संजीव यादव, विकास तिडके, सुचेता कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे.