Published On : Wed, Mar 10th, 2021

त्रिवेणी संगमावर वसले आहे कामठी चे 335वर्ष जुने ऐतिहासिक शिव मंदिर

कामठी :-कोलार, कन्हान आणि पेंच नदीच्या काठावर म्हणजे या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर जुनी कामठी येथील शिव मंदिर वसले असून ते 335 वर्षे जुने आहे. राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने या विभागाला ‘क’श्रेणीचा दर्जा दिला असला तरी येथे अजूनही बहुधा मूलभूत सुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा शिव भक्तांचा आवडता दिवस महाशिवरात्रीपर्व हा आज 11 मार्च ला आला असून या मंदिरात महाशिवरात्री निमित्त भक्तांच्या मंदियाळीसह जत्रा भरते मात्र मागील वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कोरोनाचे सावट असल्याने मंदिरात भक्तांची गर्दी कमी असणार आहे .कोरोनाच्या नावाखाली महाशिवरात्री पर्व हा साध्या पद्धतीने होणार आहे.

335 वर्षांपूर्वी सन 1725च्या जवळपास राजे रघुजी भोसले यांनी या मंदिराची स्थापना केली होती.ते पूजेनंतर मंदिराच्या मागे बसलेल्या ओट्यावर बसून त्रिवेणी संगमाचे सुंदर दृश्य न्ह्याळायचे नंतर इंग्रजांच्या काळात या मंदिराकडे दुर्लक्षित झाले हे मंदिर पूर्णपणे ढासळून गेले होते मध्य नेपाळातील काठमांडू निवासी शिवदत्त पुरी यांनी या मंदिराचे काम सांभाळले .सन 1976 मध्ये भक्तांनी एकत्र येऊन वर्गणी गोळा करून विद्दुत व्यवस्था तसेच 3 मार्च 1979 मध्ये मंदिर जिर्णोद्धाराचे काम सुरु केले.त्यावेळी गोळा झालेला हजारो रुपये खर्च झाला यावेळी 10 हजार रुपये खर्च करून येथे हातपंपाची व्यवस्थाही करण्यात आली.या मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व बघून कामठी तील शिवभक्त नागरिक व्यापारो यांनी मंदिराच्या वाढीसाठी भरीव मदत दिली.27 ऑगस्ट 1980लाभक्तांच्या बैठकीत 151 रुपये देणाऱ्यांना आजीवन सदस्य बनविण्यात आली.तसेच टिपू पटेल जे आग्र्याचे मालगुजारी होते त्यांच्याकडे 14गावाची मालगुजारी होती त्यांनीसुद्धा मंदिर निर्माण कार्यात भरीव सहकार्य केले.22ऑक्टोबर 1988 मध्ये शिव मंदिर समितीची स्थापना करण्यात आली.या समितीच्या मानद अध्यक्ष माजी खासदार राणी चित्रलेखाताई भोसले ह्या आहेत.

या समितीने मंदिराच्या परिसरात मार्कंडेश्वर महादेव मंदिराची स्थापना केली . हे ऐतिहासिक शिव मंदिर कामठी शहरापासून पाच किमी दूर अंतरावर आहे. पूर्वी या मंदिरात दर्शनार्थ जाण्यासाठी गाडेघाट नदी ओलांडून जावे लागत होते मात्र तत्कालीन शिवसेना-भाजप युतीच्या काळात या कन्हान(गाडेघाट) नदीवर बांधण्यात आलेल्या लोखंडी पुलामुळे नदी ओलांडुन जाण्याची गरज राहत नाही।दरवर्षी महाशिवरात्रीला या कामठेशर मंदिरात मोठी यात्रा भरते मात्र या यात्रेला मागील वर्षी व यावर्षी सुदधा कोरोनाचे ग्रहण लागले।कामठेश्वर मंदिराचे अनेक चमत्कार सांगितले जातात .येथील एक सिद्ध पुरुष होते.

एक दिवस चहा व साखर नसल्यामुळे त्यांनी त्रिवेणी संगमाचे पाणी ग्लासात घेतले आणि त्यात मंदिरातील अंगारा पाण्यात मिसळविला आणि गरम चहा तयार झाला यासारख्या कित्येक चमत्कारिक घटना सांगण्यात येतात.शासनाने या पर्यटन स्थळाला क श्रेणीचा दर्जा दिला असला तरो हे मंदिर परिसर बहुतांश सुविधेपासून वंचित आहे तेव्हा लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष पुरवावे अशी मागणी येथील भक्तगण करोत आहेत.

संदीप कांबळे कामठी