Published On : Wed, Mar 10th, 2021

बसपा ने सावित्रीबाईंना अभिवादन केले

भारतीय स्त्री शिक्षणाच्या आद्यशीक्षीका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्यांच्या 124 व्या स्मृतीदिना निमित्त नागपूर जिल्हा बसपा च्या वतीने आज महात्मा फुले मार्केट परिसरात क्रांतीज्योती च्या पुतळ्याला

प्रदेश बसपा चे महासचिव प्रा भाऊसाहेब गोंडाने, प्रदेश सचिव उत्तम शेवडे, नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम मनपा पक्षनेत्या वैशाली नारनवरे, आसीनगर झोन सभापती वंदना चांदेकर, महिला नेत्या वर्षाताई वाघमारे, सुरेखाताई डोंगरे, वर्षाताई सहारे, प्रा करुणा मेश्राम, मायाताई उके यांनी माल्यार्पण करुन अभिवादन केले*.

याप्रसंगी नागपूर जिल्हा सचिव गौतम गेडाम, हर्षवर्धन डोईफोडे, अभिलेश वाहने, बुद्धम् राऊत, मनोज गजभिये, अनिल मेश्राम, माजी नगरसेवक गौतम पाटील, संजय जयस्वाल, मध्य नागपूरचे अध्यक्ष प्रवीण पाटील, दक्षिण नागपूरचे अध्यक्ष नितीन वंजारी, दक्षिण-पश्चिम चे अध्यक्ष सदानंद जामगडे, चंद्रशेखर कांबळे, राजीव भांगे, विलास पाटील, सुबोध साखरे, परेश जामगडे, शंकर थुल, संजय सोमकुवर, विलास मून, अमन गवळी आदि प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

बसपा चे पदाधिकारी व कार्यकर्ते शासकीय नियमांचे पालन करुन यावेळी उपस्थित झाले होते.

क्रां. सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांना भारतरत्न मिळालेच पाहिजे अशी मागणी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनी बसपा नेत्यांनी घोषणा देऊन केली.