Published On : Tue, Feb 23rd, 2021

कोरोना चाचणीसाठी मनपाचे विविध भागात शिबिर दूध, भाजी विक्रेत्यांची चाचणी

Advertisement

नागपूर : कोव्हिड – १९ ला न घाबरता काळजी घेणे हेच सर्वोत्तम उपाय आहे. त्यामुळे कुठलीही लक्षणे आढळली अथवा लक्षणे नसली तरी स्वत:ची कोव्हिड चाचणी करवून घेणे गरजेचे आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील हॉटस्पॉट क्षेत्रात बाजारपेठेत, सोसायटी तसेच अन्य विभागात विशेष कोव्हिड चाचणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहे. जास्तीत-जास्त नागरिकांची चाचणी करुन कोरोनावर नियंत्रणा करता येईल. मागच्या काही दिवसात कोरोना बाधीतांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे मनपा तर्फे मोठया संख्येत चाचणी करण्यात येत आहे.

महापौर श्री. दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांचा आदेशान्वये शहराचे विविध भागात शिबिरांचे माध्यमाने नागरिकांची कोव्हिड चाचणी केली जात आहे. आरोग्य विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर यांचा मार्गदर्शनात शिबिरांचे आयोजन मंगळवारी (२३ फेब्रुवारी) रोजी तहसिल पोलीस स्टेशन गांधीबाग, स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य कार्यालय, आई.बी.एम.सिविल लाईन्स, लोणारा येथील सेन्ट्रल इंडिया कॉलेज मध्ये करण्यात आले.

नागरिकांचा चांगला प्रतिसाद या शिबिरांना प्राप्त झाला. मोठया संख्येत नागरिक चाचणीसाठी समोर येत आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे शनिवारी/रविवारी बाजारपेठ बंद करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे तसेच शाळा, महाविद्यालयांना ही ७ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

मनपाच्या आरोग्य विभागाचे माध्यमाने बाजारपेठेत, हॉटस्पॉट क्षेत्रात तसेच रहिवासी क्षेत्रांमध्ये कोव्हिड चाचणी केली जात आहे. दूध विक्रेता, भाजी विक्रेता, घरकाम करणा-या मोलकरीण यांचीसुध्दा चाचणी करण्यात येत आहे. झोनल वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात डॉ.शुभम मनगटे, डॉ.सागर नायडू, डॉ.साहिल अंसारी, डॉ.मोनाली कायरकर, डॉ. आशीष हरणे यांनी नागरिकांची कोव्हिड चाचणी केली.