Published On : Tue, May 23rd, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात

एसटी-ट्रकच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू तर 13 जखमी
Advertisement

नागपूर: सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का या गावाजवळ ट्रकने समोरून येणाऱ्या एसटीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून १३ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णाल्यात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघातात एसटी आणि ट्रक या दोन्ही वाहनांचा चेंदामेंदा झाला आहे.

माहितीनुसार, ही बस संभाजीनगरहून वाशिमच्या (Washim) दिशेने जात होती. त्याचवेळी सकाळी 6च्या दरम्यान ट्रक आणि बसची जोरदार धडक झाली. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 13 प्रवाशी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढणायची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Gold Rate
09 july 2025
Gold 24 KT 96,700 /-
Gold 22 KT 89,900 /-
Silver/Kg 1,08,200/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement