Published On : Sat, Apr 25th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर-भंडारा महामार्गावर मौदा जवळ भीषण अपघात; चालक जिवंत जळाला, क्लिनर गंभीर

Advertisement

नागपूर : नागपूर-भंडारा राष्ट्रीय महामार्गावर मौदा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात घडला. परमात्मा आश्रम पुलाजवळ उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिल्याने कंटेनरला भीषण आग लागली. या दुर्घटनेत कंटेनर चालकाचा जागीच जळून मृत्यू झाला, तर क्लिनर गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास घडला. धडकेनंतर मोठा स्फोटासारखा आवाज झाला आणि कंटेनरने क्षणार्धात पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना कळवले.
मौदा पोलिसांनी तात्काळ अग्निशमन दल व रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवली. मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. जखमी क्लिनरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Gold Rate
Apr 25 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,48,300/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी या अपघातासाठी रस्त्यालगत सुरू असलेल्या अवैध चहा-पान टपऱ्यांना जबाबदार धरले आहे. या ठिकाणी वाहनचालक रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या करतात, त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होते आणि अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने तातडीने अतिक्रमण हटवून वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement