टर्म इन्शुरन्स आणि गॅरंटीड रिटर्न्स प्लॅन हे दोन्हीच लोकप्रिय जीवन विमा प्लॅन्स आहेत. पण अनेक लोकांसाठी नेमकं हे समजणं कठीण असतं की कोणता प्लॅन त्यांच्या गरजांसाठी सर्वोत्तम ठरेल. टर्म इन्शुरन्स तुमच्या कुटुंबाला सुरक्षा कवच देते, तर गॅरंटीड रिटर्न्स प्लॅन विमा फायदे आणि निश्चित बचत दोन्ही देतो. या लेखात आपण पाहणार आहोत की, टर्म आणि गॅरंटीड रिटर्न्स प्लॅनमध्ये काय फरक आहे, आणि कोणता प्लॅन तुमच्यासाठी योग्य ठरेल.
टर्म इन्शुरेंस म्हणजे काय?
टर्म इन्शुरन्स ही जीवन विम्याची सर्वात सोपी आणि मूलभूत प्रकाराची पॉलिसी आहे. जशी नावावरून स्पष्ट होते, ती ठरलेल्या काळासाठी आर्थिक संरक्षण देते. या पॉलिसीमध्ये, तुम्ही ठराविक प्रीमियम भरता उदा. 10, 20, किंवा 30 वर्षे. जर पॉलिसीच्या कालावधीत तुमचा मृत्यू झाला, तर तुमच्या कुटुंबाला म्हणजे नॉमिनीला विमा रक्कम मिळते. पण, जर तुम्ही पॉलिसीच्या कालावधीत जिवंत राहिलात, तर काहीही परत मिळत नाही.
टर्म इन्शुरन्स प्युअर प्रोटेक्शन कसं देते
बरेचदा तुम्ही ऐकलं असेल प्युअर प्रोटेक्शन. आता नेमकं ‘प्युअर’ म्हणजे काय?
टर्म इन्शुरन्स हा जीवन विम्याचा सर्वात ‘प्युअर’ किंवा शुद्ध प्रकार मानला जातो. अनेक लोकांना वाटतं की विमा पॉलिसीत पैसे भरल्यावर शेवटी काही रक्कम परत मिळेल. पण टर्म इन्शुरन्समध्ये तसं होत नाही.
विमा हा एक करार आहे. तुम्ही प्रीमियम भरता, आणि कंपनी तुमच्या मृत्यूच्या परिस्थितीत तुमच्या कुटुंबाला पैसे देते. पॉलिसी टर्म म्हणजेच पॉलिसीचा कालावधी, ती किती वर्षे चालेल. जर त्या काळात तुमचा मृत्यू झाला, तर नॉमिनीला रक्कम मिळेल. पण जर तुम्ही पूर्ण कालावधी तुम्ही जीवंत राहिलात तर काही रक्कम मिळणार नाही.
- यात मॅच्युरिटी बेनिफिट नसतो.
- म्हणजे गुंतवणूक, बचत किंवा नफा नाही.
- फक्त मृत्यूच्या वेळी कुटुंबाला आर्थिक संरक्षण.
म्हणून टर्म इन्शुरन्सला प्युअर प्रोटेक्शन म्हटलं जातं. यात फक्त मृत्यूची जोखीम कव्हर केली जाते.
टर्म इन्शुरन्स पॉलिसीची मुख्य वैशिष्ट्ये आणि फायदे
हे विमा इतरांपेक्षा वेगळं बनवणारी वैशिष्ट्यं अशी आहेत –
फीचर्स
- फक्त मृत्यू कव्हर- टर्म इन्शुरन्सचा मुख्य उद्देश फक्त मृत्यूची जोखीम कव्हर करणे हा असतो. इथे कुठलाही बोनस, मॅच्युरिटी अमाऊंट किंवा नफा नसतो.
- प्रीमियम पेमेंट ऑप्शन्स- तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक प्रीमियम भरायचं ठरवू शकता. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सिंगल पेमेंट करून पूर्ण प्रीमियम एकावेळी भरू शकता आणि पुढे फक्त संरक्षणाचा फायदा घेऊ शकता.
- क्लेम पेआउट ऑप्शन– जेव्हा तुमच्या कुटुंबाला विमा रक्कम मिळते, तेव्हा ती कशी मिळावी हे सुद्धा तुम्ही आधीच ठरवू शकता. गरज असल्यास पूर्ण रकम एकावेळी घेऊशक्ता किंवा इन्कमसारखी प्रतेक महिन्याला घेऊ शकता.
- कव्हर वाढवण्याची सोय- काही पॉलिसींमध्ये कव्हरची रक्कम आपोआप वाढत जाते. हा पर्याय महागाई आणि वाढत्या खर्चाला तोंड देण्यासाठी उपयुक्त ठरतो.
- परवडणारा प्रीमियम- टर्म इन्शुरन्स इतर सर्व पॉलिसींपेक्षा स्वस्त आहे. कमी प्रीमियममध्ये खूप मोठं कव्हरेज मिळतं.
- रायडर्स (अतिरिक्त कव्हर) – टर्म इन्शुरन्समध्ये तुम्ही हवे असल्यास अतिरिक्त कव्हर जोडू शकता. यामुळे तुमची पॉलिसी अजून मजबूत आणि फायदेशीर होते. काही महत्वाचे रायडर्स असे –
- क्रिटिकल इलनेस रायडर – जर एखादी गंभीर आजाराची (उदा. कॅन्सर, हार्ट अटॅक इ.) लागण झाली, तर विमा कंपनीकडून ठराविक रक्कम मिळते.
- ॲक्सिडेंटल डेथ बेनिफिट रायडर – जर पॉलिसीहोल्डरचा अपघातात मृत्यू झाला, तर नॉमिनीला बेसिक सम अॅश्योर्ड व्यतिरिक्त अतिरिक्त रक्कम मिळते.
- प्रीमियम वेव्हर बेनिफिट – जर गंभीर आजार किंवा अपंगत्वामुळे तुम्हाला प्रीमियम भरता आला नाही, तरी पुढील प्रीमियम माफ होतात आणि पॉलिसी सुरूच राहते.
फायदे
- फायनान्शियल सिक्युरिटी – जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत नसता, तेव्हा घरचे खर्च, बिलं सुरूच राहतात. अशा संकटाच्या वेळी टर्म इन्शुरन्स तुमच्या कुटुंबाला मदत करतो. मिळणारी सम अॅश्योर्ड रक्कम तुमच्या कुटुंबासाठी आर्थिक आधार ठरते.
- टॅक्स बेनिफिट – तुम्ही जे प्रीमियम भरता, त्यावर तुम्हाला इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 च्या कलम 80C अंतर्गत सूट मिळते. त्याचबरोबर कलम 10(10D) अंतर्गत डेथ बेनिफिट पूर्णपणे टॅक्स-फ्री असतो.
गारंटीड रिटर्न्स प्लान
हा प्लॅन म्हणजे एक प्रकारचा एन्डोमेंट प्लॅन आहे. यात संरक्षणासोबत बचतही होते. पॉलिसीच्या कालावधीत तुमचा मृत्यू झाल्यास तुमच्या कुटुंबाला (नॉमिनीला) डेथ बेनिफिट म्हणजे विमा रक्कम मिळते. आणि जर तुम्ही पॉलिसीच्या कालावधीपर्यंत जिवंत राहिलात, तर तुम्हाला मॅच्युरिटी बेनिफिट मिळते.
गारंटीड रिटर्न्स प्लॅन मध्ये तुम्ही जे प्रीमियम भरता, त्याचं दोन भागांमध्ये वाटप केलं जातं –
- लाइफ कव्हर साठीचा हिस्सा – एक भाग तुमच्या लाइफ कव्हरसाठी वापरला जातो. पॉलिसी चालू असताना तुमचा मृत्यू झाल्यास तुमच्या कुटुंबाला डेथ बेनिफिट मिळतं.
- इन्व्हेस्टमेंट साठीचा हिस्सा – हा भाग सुरक्षित गुंतवणुकीत टाकला जातो. यावरून तुम्हाला पॉलिसी संपल्यावर मॅच्युरिटी बेनिफिट म्हणजे ठरलेली रक्कम मिळते. ही रक्कम फिक्स्ड असते.
पॉलिसी घेताना जसा तुम्हाला आधीच सम अॅश्योर्ड सांगितला जातो, तसंच मॅच्युरिटी बेनिफिटही सांगितलं जातं. म्हणजेच मार्केट कसंही चालू असलं तरी तुम्हाला ठरलेली रक्कम नक्की मिळते. म्हणूनच याला गॅरंटीड रिटर्न्स प्लॅन म्हणतात
गॅरंटीड रिटर्न्स प्लॅनचे फीचर्स आणि फायदे
या प्लॅनची वैशिष्ट्यं टर्म इन्शुरन्ससारखीच आहेत, पण फरक पडतो तो मिळणाऱ्या फायद्यांमध्ये. चला तर मग ते बघूया.
फीचर्स
- प्रीमियम पेमेंट ऑप्शन्स – तुम्ही प्रीमियम भरण्याची पद्धत स्वतः ठरवू शकता. मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक अशा कोणत्याही प्रकारे प्रीमियम भरू शकता.
- क्लेम ऑप्शन्स – क्लेमच्या वेळी तुम्हाला पूर्ण रक्कम एकावेळी (लम्पसम) घ्यायची आहे की हप्त्यांमध्ये नियमित उत्पन्न म्हणून घ्यायची आहे, हे निवडण्याचा पर्याय असतो.
- रायडर्स – पॉलिसीमध्ये अतिरिक्त फायदे घेण्यासाठी तुम्ही रायडर्स जोडू शकता. जसे की क्रिटिकल इलनेस रायडर, ऍक्सिडेंटल डेथ बेनिफिट, प्रीमियम वेव्हर बेनिफिट इत्यादी.
- पॉलिसी टर्म – पॉलिसीचा कालावधी तुमच्या गरजेनुसार निवडता येतो.
फायदे
- आर्थिक संरक्षण – पॉलिसीच्या कालावधीत तुमचा मृत्यू झाल्यास तुमच्या कुटुंबाला (नॉमिनीला) सम अॅश्योर्ड मिळतो. जर तुम्ही पॉलिसी संपल्यानंतर जिवंत असाल तर तुम्हाला ठरलेला रिटर्न (मॅच्युरिटी बेनिफिट) मिळतो. या दोन्ही गोष्टी तुमच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा देतात. ही दोन्ही रक्कम रिटायरमेंटसाठी, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, लग्नासाठी, किंवा दैनंदिन खर्चासाठी वापरता येते.
- टॅक्स बेनिफिट- तुम्ही भरलेल्या प्रीमियमवर इन्कम टॅक्स अॅक्टच्या कलम 80C अंतर्गत सूट मिळते. तसेच पॉलिसी संपल्यानंतर मिळणारी मॅच्युरिटी रक्कम किंवा मृत्यूनंतर मिळणारा डेथ बेनिफिट कलम 10(10D) अंतर्गत पूर्णपणे करमुक्त असतो.
आर्थिक गरजेनुसार विमा प्लॅनची निवड
दोन्ही प्रकारच्या विम्यांमध्ये वेगवेगळे फायदे आहेत आणि दोन्ही आर्थिक संरक्षण देतात. पण तुमच्यासाठी सर्वोत्तम प्लॅन तो आहे जो तुमच्या गरजांनुसार योग्य आहे. कारण सर्वांना एकसारखी विमा पॉलिसी आवश्यक नसते. चला बघू कोणता प्लॅन कोणासाठी योग्य आहे.
टर्म इन्शुरन्स त्यांच्यासाठी योग्य आहे –
- ज्यांना फक्त कुटुंबासाठी सुरक्षा कवच हवे असते.
- ज्यांच्यावर कर्ज किंवा देणदार्या आहेत, जसे होम लोन, पर्सनल लोन इत्यादी.
- कमी प्रीमियममध्ये जास्त कव्हरेज हवे असते.
- ज्यांना फक्त विमा हवे आहे आणि आपली बचत मार्केट-लिंक्ड किंवा इतर गुंतवणुकीत करायची आहे.
गॅरंटीड रिटर्न्स प्लॅन त्यांच्यासाठी योग्य आहे जे –
- विम्याबरोबर बचतही करू इच्छितात.
- ज्यांना मार्केटच्या चढउतारामुळे गुंतवणूक करण्यास भीती वाटते.
- ज्यांना लाँग-टर्म बचतीसाठी योजना करायची आहे.
- ज्यांना रिटायरमेंटनंतर नियमित उत्पन्न हवे आहे.
निष्कर्ष
सर्व इन्शुरन्स एकसारखे नसतात कारण त्यांचे फायदे वेगवेगळे असतात. इन्शुरन्स फक्त टॅक्स बचतीसाठी न घेता, तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी घ्या. योग्य निवड तुम्हाला योग्य कव्हरेज देते, ज्यामुळे क्लेम रद्द होण्याची शक्यता कमी होते आणि आर्थिक अडचणींनाही तोंड देता येते.