Published On : Tue, Sep 26th, 2017

टेकाडीला चिमुकल्या मुलं, मुलीचे गरबा नुत्यास सुरूवात.

कन्हान : टेकाडी गावात नवरात्र च्या पावन पर्वावर आर जे ग्रुप व साई मित्र परिवार यांच्या सयुक्त विद्यमाने चिमुकल्या मुलं, मलीचे सुप्त कलागुणाना वाव मिळावा व गावात धार्मिकेतुन सामाजिक एकोपा निर्माण करण्याच्या सार्थ हेतुने पाच दिवशीय गरबा नुत्य महोत्सवाची शुरुवात करण्यात आली.

सोमवार दि. २५ सप्टेंबर २०१७ ला सायंकाळी पाच दिवसीय गरबा नुत्य महोत्सवाचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री शरदजी डोनेकर, व कन्हानचे नगराध्यक्ष श्री शंकरजी चहांदे, मार्गदर्शक-भुजंगजी आकोटकर, प्रतिष्ठित मान्यवर यांच्या हस्ते सामूहिकरित्या दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तदंनतर मनोहरजी वझेकर व शिवशंकरजी आकोटकर यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

गावातील छोटया लहान मुलं मुली बाहेर गावी जाऊन प्रशिक्षण घ्यावे व कुठे बाहेर जाऊन खेळावे हे शक्य नव्हते,तसेच चिमुकल्यांनी मन मारून, चूप बसून राहावं लागायचं, ही जाणीव लक्षात घेऊन आर.जे ग्रुप व साई मित्र परिवार यांनी सयुक्तरित्या आपल्या गावातीलच चिमुकल्यांच्या कला गुंणाना वाव मिळावं म्हणून गावातच नवरात्र महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला व गरबा नुत्या मध्ये पहिल्याच दिवशी चिमुकल्यांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला. गरबा प्रशिक्षक विवेक पाटील हयानी छोट्याश्या मुलं, मुलीना गरबा नुत्याचे प्रशिक्षण दिले . या कार्यक्रमाच्या आयोजनार्थ किशोर ज्वेलर्स, अवि फोटो स्टुडिओ, अथांग फोटो स्टुडिओ, नंदू केबल नेटवर्क ,एस. बी. ग्रुप, साई मित्र परिवार, वरद साई सुगंध शॉपी, प्रकाश ज्वेलर्स, फ़ॉरर्च्युन ग्रुप, गाजनान अँन्ड रिचार्ज सेंटर , नवदुर्गा कॅटर्स, युवा मित्र सामाजिक संघटन टेकाडी, टेकाडी ई-स्कूल, शिव फेब्रिकेशन, मराठा फेर्डंस ग्रुप, सा़ई मित्र परिवार कन्हान,बिरादर ग्रुप, ब्लॅक डायमंड ग्रुप, प्रशांत डान्स अकेडमी यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.

समाजसेवक समीर मेश्राम, विक्रमजी खडसे, विष्णू नागपुरे, प्रशांत कळमकर, गावातील मान्यवर मनोहरजी वझेकर, शिवशंकरजी आकोटकर , तुकारामजी कांबळे, अशोकजी गाडबैल, सुरेशजी गुरव , हरीचंद्र ठाकरे , हरिभाऊ भोगे, पंढरीची निमकर , देवेंद्रजी सेंगर, शिवनारायणजी आकोटकर , प्रभाकरजी बोराडे , नंदू लेकुळवाडे, मारुती हूड , सतिशजी घारड, रमेशजी टाकळखेडे, मनोजजी लेकुळवाडे, मनोज बोराडे, चक्रधर आकरे , भुजंगजी महल्ले, गंगाधरजी आकोटकर,व गावकरी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्नेहल शिंगणे व आभार प्रदर्शन राजूकमार वझेकर यांनी केले.

कार्यक्रमाचे यशस्वीते करिता श्रीकांत कडु, प्रफुल गाडबैल, ओम कडू, रवी सावरकर , अवि उमप, बबलू वाघमारे, कोमल टाकळखेडे, अमित भोयर, चंदू वासाडे, विपुल अटाळकर, लक्ष्मीकांत आकोटकर, कुणाल वासाडे, आस्तिक वझेकर, देवानंद भोगे, किशोर गुरव, अभिजित ठाकरे, राहुल वासाडे, सचिन भोयर , आकाश गाडबैल, अमोल राऊत, अभय कडू, मंगेश बोरघरे, सुशांत डेंगे, प्रवीण पाटील, धीरज गाडगे , मयूर सेलोकर, प्रज्वल गाडबैल, शुभम मेश्राम, तरुण मिरे, विवेक डेंगे , अमित खांनकुळे, शेखर करंडे आदी अथक परिश्रम घेत आहेत.