Published On : Mon, Sep 9th, 2019

तेजस्विनी इलेक्ट्रिक बस आगार व चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन बुधवारी

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. २३ अंतर्गत लकडगंज स्माल फॅक्ट्री एरिया, पूर्व नागपूर येथे उभारण्यात आलेल्या तेजस्विनी इलेक्ट्रिक बस आगार व चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन तथा लोकार्पण पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते बुधवारी (ता.११) सायंकाळी ५.३० वाजता करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार राहतील. प्रमुख अतिथी म्हणून उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, मनपा आयुक्त अभिजीत बांगर, माजी महापौर प्रवीण दटके, परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, बसपाच्या पक्षनेत्या वैशाली नारनवरे, राकाँचे पक्षनेते दुनेश्वर पेठे, शिवसेना पक्ष नेते किशोर कुमेरिरया, महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गि-हे, उपनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, नगरसेविका कांता रारोकर, नगरसेविका मनिषा धावडे, परिवहन समिती सदस्या अर्चना पाठक, वैशाली रोहनकर, रुपा राय, रुपाली ठाकुर, विशाखा बांते, सदस्य नितीश ग्वालबंशी, नितीन साठवणे, राजेश घोडपागे, नरेंद्र वालदे, नागेश मानकर, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त तथा परिवहन व्यवस्थापक राजेश मोहिते आदी उपस्थित राहतील.

परिवहन समिती सभापतींनी केली पाहणी
पेट्रोल, डिझेल यासारख्या इंधनाच्या वापरामुळे वाढते प्रदुषण लक्षात घेता मनपाच्या परिवहन सेवेतील वाहने सीएनजी वर चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र शासनाच्या जेएनयूआरएम योजनेंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमध्ये असलेल्या एकूण ४३२ बसेस पैकी २३७ डिझेल बसचे रुपांतर सीएनजीमध्ये करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मनपातर्फे घेण्यात आला. त्यासाठी रॉ मॅट या एजन्सीला निविदेद्वारे नियुक्त करण्यात आले आहे.

एजन्सीतर्फे डिझेल बसचे सीएनजीमध्ये परिवर्तन करण्याचे कार्य सुरू करण्यात आले असून सोमवारी (ता.९) परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी प्रकल्पाच्या कार्याचे निरीक्षक केले. यावेळी यांत्रिकी अभियंता योगेश लुंगे, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, रॉ मॅटचे श्री. सुब्बाराव, कौस्तुभ गुप्ता आदी उपस्थित होते.