Published On : Thu, Sep 5th, 2019

समाजकार्य महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

Advertisement

कामठी :- येथील सामाजकार्य महाविद्यालयात मोठ्या उत्साहात शिक्षकदिन समारोह साजरा करण्यात आला. समारोहाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ.रमेश सोमकुवर होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ.प्रणाली पाटील, डॉ. रुबीना अन्सारी,डॉ. सविता चिवंडे मंचावर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन, महात्मा जातीराव फुले,सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना हारार्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली . यानंतर विद्यार्थ्यांनी डॉ.रमेश सोमकुवर , डॉ.प्रणाली पाटील, प्रा.उज्जला सुखदेवे, डॉ.राष्ट्रपाल मेश्राम, डॉ. रुबीना अन्सारी प्रा.ओमप्रकाश कश्यप ,मनोज होले,प्रा. निशांत माटे, प्रा. शशिकांत डांगे, प्रा. मनीष मुडे, प्रा. हर्षल गजभिये, प्रा. राहुल जुनगरी, प्रा. राम बुटके, प्रा. गिरीश आत्राम, प्रा.आवेसखर्नी शेख या सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी शुभाष तिघरे , प्रफुल्ल बागडे ,उज्जला मेश्राम,गजानन कारमोरे , किरण गजभिये, शशील बोरकर , नीरज वालदे, प्रतीक कोकोडे या शिक्षकेतर कर्मचारींना भेटवस्तू देऊन सन्मानित केले.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ.रमेश सोमकुवर म्हणाले,कोणत्याही व्यक्तीच्या जीवनाला दिशा देण्यात आणि जडणघडण करण्यात गुरूचा वाटा खूप मोठा असतो. शिक्षणातून होणारी विकासाची प्रक्रिया गुरुशिवाय अपूर्ण आहे. नवीन भारत प्रत्यक्षात उतरवण्यात बौद्धिक संपत्ती सर्वश्रेष्ठ राहील त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण प्राप्त करून संशोधन क्षेत्रांत देदीप्यमान कार्य करावे,असे आवाहन केले .याप्रसंगी स्वाती नाकतोडे,शीतल नवघरे कविता लायबर, योगिता झाडे या विद्यार्थिनींनी गीत गायिले तर निकिता जुनघरे शीतल जुनघरे,योगेश लडी,स्वाती नाकतोडे, प्राची उके,प्रीती नगराळे या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले.डॉ.प्रणाली पाटील, डॉ. रुबीना अन्सारी, डॉ. सविता चिवंड यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करिष्मा वरठी हिने केले, संचालन शिल्पा शरणागत व सुरेंद्र सोनवाणे यानी केले तर धन राज वधिवा यांनी आभार मानले.

संदिप कांबळे कामठी