Published On : Thu, Sep 5th, 2019

सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कुल आणि भारत संचार निगम लिमिटेड येथे अग्निशमन विभागाची मॉक ड्रील

नागपूर: . सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कुल आणि भारत संचार निगम लिमिटेडच्या कार्यालयात नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाद्वारे मॉक ड्रिल करण्यात आली.

सेंट उर्सुला हायस्कुल आणि वसतीगृहातील मुलींना आपातकालिन परिस्थितीत सर्तक कसे रहावे व शाळेतील विद्यार्थींनीना आपातकालिन परिस्थितीत काय करावे, याचे प्रशिक्षण यावेळी देण्यात आले. या मॉक ड्रील दरम्यान कवायतींचे प्रशिक्षणही देण्यात आले. अशाच पद्धतीची मॉक ड्रील भारत दुरसंचार निगम कार्यालयातही आयोजित करण्यात आली. यावेळी तेथील कर्मचाऱ्यांना आपातकालिन परिस्थितीत काय करावे, याचे प्रशिक्षण देण्यात आले.

या दोन्ही स्थानावरील मॉक ड्रील प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली.

या मॉक ड्रिलमध्ये प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे सहा स्थानाधिकारी केशव कोठे, सुनील राऊत, अग्निशमन विमोचक संजय शेंबेकर, गोपाल तायडे, निखिल भालेराव, गौरव साबळे आदी कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. सेंट उर्सुला शाळेच्या प्राध्यापिका श्रीमती सिंग यांच्यासह सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. भारत संचार निगम लिमिटेडमध्ये श्रीमती राठी यांच्यासह कर्मचारी व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.