Published On : Fri, Nov 13th, 2020

टीसीएस विस्तार करणार, हजारो तरुणांना रोजगाराची संधी ना. गडकरी यांची अधिकार्‍यांनी घेतली भेट

Advertisement

स्थानिकांना प्राधान्य देण्याच्या सूचना

नागपूर: माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची आणि नावाजलेली कंपनी टीसीएसने आापली व्यवसायाची विस्तार योजना जारी केली असून या योजनेची माहिती त्यांनी आज केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांना दिली. ना. गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना या अधिकार्‍यांनी माहिती दिली.

Advertisement

टीसीएसच्या मानव संसाधन विभागाचे प्रमुख हर्षल गजघाटे आणि रेवती मुलमुले यांनी या विस्तार योजनेची माहिती यावेळी दिली. या योजनेमुळे आगामी काळात हजारो सुशिक्षित युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. प्रारंभी मिहान प्रकल्पात टीसीएस या कंपनीने 50 एकर जागा कंपनीने खरेदी करून आपला प्लांट सुरु केला आहे. आता आणखी 50 एकर जागा घेऊन एकूण 103 एकर जागेवर काम सुरु आहे. नव्या विस्तार योजनेसाठी कंपनीने मोठी गुंतवणूक केली असल्याचेही गजघाटे यांनी ना. गडकरी यांना सांगितले.

कंपनीच्या अधिकार्‍यांशी चर्चा करताना ना. गडकरी म्हणाले- नागपुरात नियुक्त्या करताना स्थानिक बेरोजगार तरुणांना नोकर्‍यांमध्ये प्राधान्य द्यावे. नागपूरसह विदर्भात मोठ्या संख्येने सुशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध आहे. आयटी, बिगर आयटी क्षेत्रात तसेच व्यवस्थापनाच्या क्षेत्रात नागपूरसह विदर्भातील युवकांना न्याय दिला पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली. टीसीएसची ही विस्तार योजना 3 वर्षात पूर्ण होणार असून त्यात विदर्भातील युवकांना रोजगार उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करून टीसीएसच्या अधिकार्‍यांनी पुष्पगुच्छ देऊन ना. गडकरी यांचे स्वागत करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement