Published On : Fri, Sep 13th, 2019

राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा नुकतीच संपन्न

नागपूर : राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत सप्टेंबर हा महिना ‘पोषण महिना’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, नागपूर (ग्रामीण) यांच्या वतीने सरपंच भवन, नागपूर येथे तालुकास्तरीय पोषणविषयक कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. या कार्यशाळेला अंगणवाडी सेविका व ग्रामीण भागातील महिला व मुली मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

यावेळी इडियन इन्स्टिट्यूट ऑफ युथ वेलफेअरच्या माजी प्राचार्या श्रीमती भारद्वाज यांनी स्तनपानविषयी मार्गदर्शन केले. पोषाहार विभागाचे माजी वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यांनी बाळाच्या वाढीचे सुरुवातीचे 1000 दिवस याबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहन टिकले तहसीलदार नागपूर (ग्रामीण) होते. तर कार्यक्रमाचे उद्घाटन नागपूर (ग्रामीण) पंचायत समितीचे गट विकास अधिकारी किरण कोवे यांनी. प्रास्तविक बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती भारती मानकर यांनी केले. या कार्यशाळेला तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सुजाता महंत यांनी केले तर आभार श्रीमती मनीषा भुरचुंडी यांनी मानले.