Published On : Fri, Nov 15th, 2019

चहांदे यांची फेसबुकवर बदनामी करणा-यावर कारवाई करा – भिमटे

Advertisement

कन्हान : – नगराध्यक्ष शंकर चहांदे यांच्या विषयी फेसबुक वर बदनामी केल्या प्रकरणी भादंवि कलम ५०० , ५०१ व अँट्रासिटी अँक्ट नुसार अञात आरोपी वर ४७१, ४६८, ४६६ नुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी मा संजय पुज्जलवार हयाना रिप. भिमशक्ती अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे यांनी निवेदन देऊन केली आहे .

नगरपरिषद कन्हान-पिपरी चे नगराध्यक्ष शंकर चहांदे हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असुन समाजा मध्ये सन्मान, प्रतिष्ठा आहे. ते दलित समाजा चे असुन त्यांनी राजकिय वर्तुळात व स्वराज्य संस्थेत महत्त्वाची पदे भुषविली आहेत. त्यांची फेसबुकवर अश्लील चित्र टाकुन असामाजिक तत्वानी बदनामी करण्याचे कारस्थान केल्याने या अञात समाजकंटकास त्वरित अटक करून अँट्रासिटीचा गुन्हा दाखल करावा.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा रिप. भिमशक्ती प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे हयानी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार हयाना शिष्टमंडळासह निवेदन देऊन मागणी केली आहे.

शिष्टमंडळात रिप. भिम शक्ती प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे, कैलास बोरकर, रोहित मानवटकर, नितीन मेश्राम, हर्ष पाटील, अजय चव्हाण, नरेश चिमणकर, रिंकेश चवरे, बाळ नागदेवे, अमोल साकोरे, विनोद किरपान, किरण ठाकुर, उमेश बागडे प्रामुख्याने उपस्थित राहुन अञात समाज कंटकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

Advertisement
Advertisement