Published On : Tue, Jul 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

उर्सदरम्यान मोठी कारवाई! ताजबाग परिसरातून सराईत गांजा तस्कर जेरबंद; ४४४ ग्रॅम गांजा जप्त

Advertisement

नागपूर : ताजबाग उर्सच्या पार्श्वभूमीवर सक्करदरा पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला असून संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. याच दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत गांजा विक्रीसाठी आलेल्या सराईत तस्कराला अटक केली. आरोपीकडून ४४४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सक्करदरा तलाव गार्डनजवळ एक युवक गांजा विक्रीसाठी फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीत त्याची ओळख विजय देवानंद ताजने (वय २६, रा. राणी भोसलेनगर, भांडे प्लॉट) अशी पटली.

आरोपीच्या बॅगेची झडती घेतली असता ७३ प्लास्टिक पाउचमध्ये पॅक केलेला एकूण ४४४ ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, विजय ताजने हा सराईत आरोपी असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही एनडीपीएस कायद्याअंतर्गत अनेक गुन्हे नोंद आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासासोबतच गांजा तस्करीच्या संपूर्ण पुरवठा साखळीचाही शोध घेतला जात आहे.

ही कारवाई सक्करदरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.