Published On : Thu, Apr 13th, 2017

स्वाईन फ्ल्यूने घेतला एकाच दिवशी सहा जणांचा बळी

Swine Flu

Representational Pic


नागपूर :
उपराजधानी नागपूर शहरात स्वाईन फ्ल्यूची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. शहरातील विविध रुग्णालयात बुधवारी तब्ब्ल सहा जणांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळं शहरात महिन्याभरात स्वाईन फ्ल्यू ने दगावणाऱ्यांचा आकडा १२ वर गेला आहे. यामुळं आरोग्य विभागाचे धाबे ही दणाणले आहेत.

सौम्या खातून ,नांदूबाई येन्नवार , बबिता ठाकरे, कल्पना रहमतकर , सौम्या शहा , मीना सरोदे अशी स्वाईन फ्ल्यूने बळी घेतलेल्या रुग्णांची नावे आहेत. यापैकी एकावर मेडिकल, दोघांवर मेयो तर तिघांवर क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार सुरू होते. एकाच दिवशी स्वाईन फ्ल्यूने ६ रुग्णांचा मृत्यू झाल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.