Published On : Wed, Feb 28th, 2018

विज्ञान दिना निमित्य शासकीय विज्ञान संस्थेमध्ये स्वच्छता मोहीम

Advertisement


नागपूर: विज्ञान दिवसाचे औचित्य साधून व नागपुरात नुकतेच सुरू असलेले स्वच्छता सर्वेक्षणाच्या धर्तीवर आज शासकीय विज्ञान संस्थेतील पर्यावरणशास्त्र विभागाकडून संपूर्ण शैक्षणिक परिसरामध्ये प्लास्टिक व कचरा शोध मोहिम करून परिसर स्वच्छ करण्यात आला,स्वयंप्रेरणेने पर्यावरणशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन परिसर प्लास्टिक मुक्त कसा रहावा याबद्दल चर्चा केली, संस्थेचे संचालक डॉ आत्राम सर यांनी स्वतः या मोहिमेत श्रमदान करून मोहिमेला सहकार्य केले सोबतच पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ नारखेडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांकडून हातात झाडू व कचरा पेट्या सोबत घेऊन जिथे कचरा किंवा प्लास्टिक चे साहित्य, पॉलिथिन दिसेल ते उचलून कचरापेटीत टाकण्यात आले.


आज प्लास्टिक मुळे किती समस्या उदभवतात व त्यामुळे कुठले किती संकट आपल्यासमोर आ वासून उभे आहेत याची माहिती देण्यात आली, मोहिमेत विद्यार्थीणींची उपस्थिती खूप होती. नागपूर शहराला स्वच्छता यादीत पहिला क्रमांक मिळावा अशी अपेक्षा सर्व विद्यार्थ्यांनी केली व त्यालाच एक सहकार्य म्हणून आपल्या पासून सुरुवात म्हणून संस्थेचा परिसर आज स्वच्छ करण्यात आला.पर्यावरण विभाग सोसायटी ची अध्यक्ष म्हणून एम एससी ची विद्यार्थिनी गीताई लक्षणे यांनी मार्गदर्शन केले त्यासोबत शुभम शेगावकर, हरीश बारेवार, वैभव बावनकर, रीमा शेंडे, कुमारेश टिकदार, पारुल जैस्वाल, श्रद्धा तिडके, सचिन इरपाते व पर्यावरण विभागाच्या इतर विद्यार्थ्यांनी मोहिम यशस्वी केले.