Advertisement
नागपूर: स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.६) रोजी ०२ प्रतिष्ठानांवर कारवाई करून १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात धंतोली झोन अंतर्गत न्यू मनीषनगर येथील वंजारी बिल्डर्स यांच्याविरूध्द बिल्डींग मटेरियलचे साहित्य रस्त्यालगत पसरविल्याबद्दल कारवाई करून १० हजार रुपयांचा दंड वसूल केला.
तसेच आशीनगर झोन अंतर्गत पाचपावली येथील हेरी स्वीटस या दुकानाविरूध्द दुकानाचा कचरा आजुबाजुच्या परिसरात व रस्त्यालगत टाकल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.