Published On : Wed, Apr 27th, 2022
By Nagpur Today Nagpur News

स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता.२६) रोजी ०३ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ६० हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ झोन अंतर्गत सेट्रल बाजार रोड, रामदासपेठ येथील शुश्रृत हॉस्पीटल या रूग्णालयाविरूध्द सामान्य कच-यासोबत बायोवेस्ट चा कचरा टाकल्याबद्दल कारवाई करून ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला.

त्याचप्रमाणे गांधीबाग आणि लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. पथकाने गांधीबाग झोन अंतर्गत गोलीबार चौक येथील राजु प्लास्टिक या दुकानाविरूध्द प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

Gold Rate
May 04- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,50,400 /-
Gold 22 KT ₹ 1,39,900 /-
Silver/Kg ₹ 2,47,300/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तसेच लकडगंज झोन अंतर्गत तुकाराम नगर येथील राजेश किराणा ॲण्ड गेन शॉप यांच्याविरूध्द प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement