Published On : Wed, Jan 25th, 2023

स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई

Advertisement

नागपूर, ता. 25 : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.25) 8 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 55 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 1 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 4 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.

उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल सतरंजीपूरा झोन अंतर्गत मारवाडी चौक येथील कार्तिक स्विटस यांच्याविरुध्द कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

त्याचप्रमाणे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत धंतोली येथील RNH Hospital यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच लक्ष्मीनगर येथील गुलाब निणावे यांच्याविरुध्द यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य कचरा पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हनुमाननगर झोन अंतर्गत प्लॉट न. 106, महालक्ष्मीनगर येथील M/s Buildcon Construction Co यांच्याविरुध्द यांच्याविरुध्द यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य कचरा पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत प्रभाग न. 33, बालाजी नगर येथील M/s Everest Builders यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत भावसार चौक येथील हॉटेल इंडियन सन यांच्याविरुध्द हॉटेलचा कचरा रस्त्यालगत पसरविल्याबद्दल आणि कचरा शुल्क न भरल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लकडगंज झोन अंतर्गत नेताजी नगर, पारडी येथील M/s Bubbles n Colors Pre School यांच्याविरुध्द विनापरवानगीने विद्युत खांबावर डिस्प्ले बॅनर / होर्डिंग लावल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आशीनगर झोन अंतर्गत प्रभाग न. 03, पिली नदी चौक येथील M/s Orange City Heights यांच्याविरुध्द विनापरवानगीने विद्युत खांबावर डिस्प्ले बॅनर / होर्डिंग लावल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.