Published On : Wed, Mar 15th, 2023
By Nagpur Today Nagpur News

स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई

Advertisement

नागपूर, : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.15) 7 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 40 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात नेहरुनगर, गांधीबाग आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 4 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.

उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल नेहरुनगर झोन अंतर्गत न्यू नंदनवन येथील किर्ती रेस्टॉरेन्ट यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

गांधीबाग झोन अंतर्गत प्रभाग न.18, बडकस चौक, महाल येथील ठाकुर दुध भंडार या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत प्रभाग न.05, बाबा रामसुमेर नगर येथील केजीएन स्वीटस या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Advertisement

त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत इन्दीरा गांधी हॉस्पीटल जवळ, शंकरनगर येथील राधाकृष्ण गारमेंट आणि कच्चीमेट, अमरावती रोड येथील सुरेन्द्र रेस्टॉरेंट यांच्याविरुध्द रस्त्यालगत दुकानातील कचरा टाकल्याबद्दल आणि कचरा शुल्क न भरल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत सुरज सोसायटी, मनीष नगर येथील साई छाया रेसीडेन्सी यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आशीनगर झोन अंतर्गत प्रभाग न.07, लष्करीबाग येथील आझम पब्लीक स्कुल यांच्याविरुध्द विनापरवानगीने विद्युत खांबावर डिस्प्ले बोर्ड / होर्डींग्ज लावल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.