नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.17) 5 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 26 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ, सतरंजीपूरा आणि लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 414 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल धरमपेठ झोन अंतर्गत माऊंट रोड, सदर येथील रिध्दी पॅकींग कंपनी यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करुन 400 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. सतरंजीपूरा झोन अंतर्गत नेहरु पुतला, जैन मंदीर जवळ येथील राकेश इन्टरनॅशनल या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लकडगंज झोन अंतर्गत भंडारा रोड, पारडी येथील दशरथ धनगर या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
त्याचप्रमाणे नेहरुनगर झोन अंतर्गत गजानन चौक येथील शक्ती बार ॲण्ड रेस्टॉरेन्ट यांच्याविरुध्द रस्त्यालगत कचरा पसरविल्याबद्दल कारवाई करून 6 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच आशिनगर झोन अंतर्गत प्रभाग नं.06, वैशालीनगर येथील Priyank Medicals यांच्याविरुध्द दुकानाचा सामान्य कचरा रस्त्यालगत पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.