Published On : Mon, Mar 20th, 2023

स्वच्छ भारत अभियान : 1025 किलो प्लास्टिक जप्त

Advertisement

नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.20) 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 1 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 1028 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. लकडगंज झोन येथे 40 पोत्यामध्ये भरलेले सिंगल यूज 1025 किलो प्लास्टिक जप्त केले. प्लास्टिक कॅरीबॅग कोणाची आहे, याची माहिती घेण्यात येत आहे.

उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल धंतोली झोन अंतर्गत कॉटन मार्केट येथील महालक्ष्मी ‍डिस्पोजल या दुकानाविरुध्द कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

त्याचप्रमाणे नेहरुनगर झोन अंतर्गत दिघोरी चौक येथील हदवार हॉस्पीटल यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.