Published On : Thu, Oct 25th, 2018

ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसचे सस्पेंशन स्प्रिंग तुटले

Advertisement

नागपूर: हावडा -एलटीटी ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसचे सस्पेंशन स्प्रिंग तुटले. रेल्वे कर्मचाºयाच्या सतर्कतेमुळे ही घटना गुरुवारी उघडकीस आली. नागपूर रेल्वे स्थानकावर गाडी आल्यानंतर स्प्रिंग तुटलेला कोच बदलविण्यात आला. यावेळी प्रवाशांचे सामान एका डब्यातून दुसºया डब्यात शिफ्ट करण्यासाठी कुलींनी नि:शुल्क सेवा दिली.

१२१०२ हावडा – एलटीटी डिलक्स ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसच्या एस-४ बोगीचे सस्पेंशन स्प्रिंग अचानक तुटले. हा प्रकार गाडीतील कर्तव्यदक्ष कर्मचाºयाच्या निदर्शनास आला. या घटनेची माहिती पुढे येणाºया रेल्वे स्थानकाला देण्यात आली. स्प्रिंंग तुटल्यामुळे गाडी आपल्या निर्धारीत वेळेपेक्षा ३ तास उशिरा धावत होती. या गाडीची नागपूर रेल्वे स्थानकावर येण्याची वेळ ४.२० आहे. मात्र, ही गाडी सायंकाळी ७.२५ वाजता नागपूर स्थानकावर पोहोचली.

या गाडीला होम फलाटावर घेण्यात येते मात्र, तांत्रिक काम असल्यामुळे फलाट क्रमांक ३ वर घेण्यात आले. गाडी येण्यापूर्वीच रेल्वे अधिकारी आणि तात्रिक कर्मचारी फलाटावर उपस्थित होते. नागपुरात या गाडीचा कोच बदलविण्याची प्रक्रिया सुरू झाली. या प्रक्रियेला अधिक वेळ लागला नाही. मात्र इंजिनपासून डबा वेगळा करणे आणि पुन्हा नवा डबा जोडणे यासाठीच वेळ लागला.

शिवाय एका बोगीतील सामान दुसºया बोगीत शिफ्ट करण्यासाठीही बराच वेळ लागला. याकामी कुलींनी नि:शुल्क सेवा दिली. तात्रिक आणि प्रवाशांची व्यवस्था सुरळीत होण्यासाठी स्टेशन निदेशक दिनेश नागदेवे आणि उपस्टेशन व्यवस्थापक अतुल श्रीवास्तव दिड तास लक्ष ठेवून होते. रात्री ८.४८ वाजताच्या सुमारास गाडी पुढील प्रवासाला निघाली.