Published On : Fri, Jul 4th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नाशिकमधील संगमेश्वर भूखंड गैरव्यवहार प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्याचे निलंबन

* आठ मुद्रांक अधिकाऱ्यांची चौकशी
Advertisement

मुंबई,: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मौजे संगमेश्वर आणि गुगळगाव येथील भूखंड अदलाबदलीतील गैरव्यवहार प्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर पाऊल उचलले असून उपविभागीय अधिकारी उदय किसवे यांचे तात्काळ निलंबन आणि आठ मुद्रांक अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशीचे आदेश देत त्यांनी दोषींवर कडक कारवाईचे संकेत विधानसभेत दिले आहेत.
स्टॅम्प वेंडर जाकीर आणि आरिफ अब्दुल लतीफ यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

आ. गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेत अधिवेशनात उपस्थित केलेल्या प्रश्नात मौजे संगमेश्वर येथील सिटी सर्व्हे क्र. १४४ अ आणि मौजे गुगळगाव येथील गट क्र. २५३ यांच्या बिनशेती परवानगीशिवाय झालेल्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश केला. २००२ च्या परिपत्रकानुसार, भूखंड किंवा शेतीच्या अदलाबदलीसाठी जमिनी सलग असणे आवश्यक आहे. परंतु, उदय किसवे यांनी संगमेश्वरची जमीन गुगळगावला आणि गुगळगावची जमीन संगमेश्वरला स्वॅप करून नियमांचा भंग केला. यामुळे त्यांचे निलंबन करत एका महिन्याच्या आत विभागीय चौकशी पूर्ण करून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन बावनकुळे यांनी यावेळी दिले.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आ. पडळकर यांनी सभागृहात सांगितले की, या जमिनीचे १६ विभाग आणि २७२ तुकडे करून तुकडेबंदी कायद्याचे तसेच एमआरटीपी कायद्याचे उल्लंघन झाले आहे. २०१३ ते २०१९ या काळात २५८ अनधिकृत दस्त नोंदणी झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या प्रकरणात मुद्रांक अधिकारी भुरके, गावित, कापडण्या, गुप्ते, हिरे, कळसकर, मोतीराळे आणि वाणी यांनी चुकीच्या दस्तनोंदणीद्वारे अधिकाराचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे. या सर्व आठ अधिकाऱ्यांवर प्राथमिक चौकशी करून अधिवेशन संपण्यापूर्वी कारवाई पूर्ण करण्याचे महसूल मंत्र्यांनी सांगितले.

या गैरव्यवहारात स्टॅम्प वेंडर जाकीर आणि आरिफ अब्दुल लतीफ यांनीही साथ दिल्याचे निदर्शनास आले असून, त्यांच्यावर फौजदारी कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. “सर्व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,” असे बावनकुळे यांनी ठामपणे सभागृहात जाहीर केले.

Advertisement
Advertisement