Published On : Wed, Aug 7th, 2019

सुषमा स्वराज यांच्या निधनाने राजकारणातील अष्टपैलू व्यक्तीमत्व हरपले!: विजय वडेट्टीवार

Advertisement

मुंबई: माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त दुःखद असून त्यांच्या निधनाने राजकारणातील सुसंस्कृत आणि अष्टपैलू व्यक्तीमत्व हरपले असल्याची भावना विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.

स्वुषमा स्वराज यांना नेतृत्व, दातृत्व व कर्तृत्व लाभले होते. आपल्या प्रभावी व अभ्यासू भाषणाने त्यांनी संसदेत आपला वेगळा ठसा उमटला होता. त्यांचे भाषण सर्वांसाठी पर्वणी असायचे. त्या कुशल प्रशासकही होत्या. राजकीय व सामाजिक क्षेत्रात त्यांना मिळालेली जबाबदारी त्यांनी सक्षमपणे पार पाडली.

राज्यसभा व लोकसभेचेही त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. हरियाणाच्या मुख्यमंत्री तसेच दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले. वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालय व त्यानंतर आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली.

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. त्यांच्या निधनाने एक सुसंस्कृत व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.