Published On : Thu, Aug 8th, 2019

मा.सुषमा स्वराज हयाना भाजपा व्दारे भावपूर्ण श्रध्दाजंली अर्पण

कन्हान : – भाजपा च्या वरिष्ठ महिला नेत्या मा. सुषमा स्वराज हयाच्या निधना ने भारतीय जनता पक्षातील खंभीर नेतृत्वाची हाणी झाल्याने भाजपा कन्हान व्दारे भावपूर्ण श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली.

भाजपा च्या वरिष्ठ नेत्या, माजी विदेश मंत्री व माजी दिल्ली च्या मुख्यमंत्री मा. सुषमा स्वराज यांचे मंगलवारी रात्री ९.३० वाजता दिल्ली च्या एम्स दवाखान्यात उपचार दरम्यान दु:खद निधन झाले. सुषमा स्वराज ६७ वर्षाच्या होत्या. त्याच्या निधनाने संपुर्ण देशात शोक व्यकत करण्यात येत आहे.

भाजपा कन्हान शहर व्दारे नगर परिषद कन्हान – पिपरी च्या आवारात श्रध्दाजंली कार्यक्रम नगराध्यक्ष मा. शंकर चहांदे यांच्या अध्यक्षेत व भाजपा तालुका अध्यक्ष जयराम मेहरकुळे यांच्या हस्ते मा. सुषमा स्वराज हयाच्या प्रतिमेला पुष्पहार वाहुन, दिप प्रज्वलित करून दोन मिनीट मौनधारण करून भावपूर्ण श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी माजी नगराध्यक्षा अँड आशाताई पनीकर, उपाध्यक्ष डॉ मनोहर पाठक, भाजपा कन्हान शहर अध्यक्ष विनोद किरपान, महामंत्री अमोल साकोरे , सुनील लाडेकर, नगरसेविका लक्षी लाडेकर, सुषमा चोपकर, संगीता खोब्रागडे, अनिता पाटील, मयुर माटे, रिंकेश चवरे, ऋृषभ बावनकर, किरण ठाकुर, हर्ष पाटील, संदीप कभे, विनय यादव, चंदन मेश्राम, राणु शाही, शैलेश शेळकी सह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ता व नागरिकांनी उपस्थित राहुन भावपूर्ण श्रध्दाजंली अर्पण केली.