Published On : Mon, Feb 3rd, 2020

मराठा आंदोलकांची खासदार सुप्रियाताई सुळे यांनी घेतली भेट

Advertisement

आज संध्याकाळी साडेचार वाजता मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक…

Advertisement

मुंबई : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदान येथे सुरु असलेल्या आंदोलकांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज भेट घेतली.

यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याशी विविध मागण्यांवर आंदोलकांनी चर्चा केली शिवाय मागण्यांचे निवेदनही दिले.

अखेर सात दिवसापासून सुरु असलेल्या आंदोलकांच्या भेटीनंतर आज संध्याकाळी साडेचार वाजता सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजीराव जोंधळे आणि दोन्ही पक्षांचे वकील व
बैठकीला आंदोलनातील सहभागी चार समन्वयक देखील सहभागी होणार आहेत अशी माहिती खासदार सुप्रियाताई सुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.