Published On : Sat, Aug 31st, 2019

सामुहिक बलात्कार प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली पोलिस महासंचालकांची भेट.

आरोपींना तात्काळ अटक करा ;पिडीत कुटुंबाला संरक्षण द्या ;निवेदन केले सादर

मुंबई : चेंबूर येथील सामुहिक बलात्कार प्रकरणातील पिडीत मुलीच्या भावासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी आज पोलिस महासंचालकांची भेट घेतली.

यावेळी पीडितेच्या कुटुंबियांना संरक्षण पुरवण्याची मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली आहे. तसेच राज्यातील वाढत्या महिला अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी चर्चा केली त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांना निवेदन सादर केले.

यावेळी राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष व राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, आमदार विद्याताई चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.