Published On : Wed, Mar 10th, 2021

सुप्रिया सुळे यांनी लोकसभेचे अध्यक्ष यांची घेतली भेट

Advertisement

– खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणाची चौकशी करण्याची निवेदनाद्वारे केली मागणी

नवी दिल्ली – राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज विरोधी पक्षाच्या खासदारांसह लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेत खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत एक निवेदनही दिले.

Advertisement
Advertisement

सुप्रिया सुळे यांनी या निवेदनात खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली. ही घटना अत्यंत वेदनादायी आणि तेवढीच धक्कादायकही आहे. सातवेळा खासदारकी भूषवणारे मोहन डेलकर इतके निराश झाले होते, वैफल्यग्रस्त झाले होते की त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. आपण आपल्या सहकाऱ्याला गमावलं आहे. तुम्ही लोकसभेचे प्रमुख आहात. त्या नात्याने या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जावी अशी मागणी केली.

दरम्यान भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी योग्य ते उपाय योजण्याची गरज आहे असेही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी या पत्रात सुचवले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement