कोरोना व्हायरसचा कहर हा जगभरात पाहायला मिळत आहे. भारतात सुद्धा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. आतापर्यंत देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 78,000 वर पोहचली आहे. तर 2400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान अनेक गोष्टी या बदलल्या आहेत. वकिलांनाही नवा ड्रेस कोड देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.
कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला आहे. या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर वकिलांना व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान नेहमीचा काळ्या रंगाचा कोट किंवा रोब घालण्याचं बंधन नसल्याची माहिती न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे वकील हे आता पांढऱ्या शुभ्र कपड्यात दिसणार आहेत. युक्तीवाद करताना वकील केवळ पांढरा शर्ट आणि नेक टाय वापरू शकणार आहेत. त्यांना त्यावर काळा कोट घालण्याची गरज नसल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.
❗सर्वोच्च न्यायालयाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एक उपाययोजना म्हणून तात्पुरत्या स्वरुपात हा निर्णय घेतला आहे. तसेच यासंदर्भात एक निवेदन जाहीर केलं आहे. ‘व्हर्चुअल कोर्ट सिस्टिममध्ये सुनावणीदरम्यान वकील प्लेन पांढरा शर्ट, महिला वकील पांढऱ्या रंगाची सलवार-कमीज, साडी तसेच गळ्याभोवती प्लेन पांढरा नेकबँड वापरू शकतात.