Published On : Thu, May 14th, 2020

लोकजागृती मोर्चा तर्फे रेशीमबागेत अन्नदान भिक्षाफेरीच यशस्वी आयोजन

लोकजागृती मोर्चा आणि लोकमान्य सांस्कृतिक व क्रीड़ा मंडळाच्या वतीने रेशिमबागेत गत 40 दिवसांपासून कोरोनामुळे बाधित गरीब, विस्थापित मजूर, गरजू व अन्नावंचित बांधवांसाठी अन्नदान सेवा यज्ञ सुरु आहे. आतापर्यंत 21000 पेक्षा अधिक गरजू पर्यन्त फ़ूड पैकेट्स पोहोचले आहेत. या अन्नदान सेवा यज्ञासाठी संस्थेतर्फे रेशिमबाग येथे भिक्षा फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
गजाजन महाराज मंदिर येथून श्री गिरिश वराड़पांडे यांच्या हस्ते पूजन करुन व समर्थ रामदास स्वामींच्या प्रतिमेस माल्यार्पण करुण भिक्षाफेरीची सुरवात करण्यात आली.

जय जय रघुवीर समर्थ , ॐ भवति भिक्षां देहि च्या गजरात परिसरातील वकील, डॉक्टर, इंजीनियर, उद्योजक, विद्यार्थी व तरुण मंडळी या फेरीत सहभागी झाले होते. त्यामुळे समाजातील अनेक गणमान्य व्यक्ती समजाकरिता व राष्ट्राकरिता भिक्षा मागीत आहेत, या अँड रमण सेनाड यांच्या संकल्पनेचे परिसरात खुप कौतुक होत होते व नागरिक या भिक्षाफेरिला सामोरे जावून सहर्ष व श्रद्देने भिक्षा देत होते.

समर्थ रामदास स्वामींचा फोटो, भगवे झेंडे, सायकल रिक्शे, भगव्या टोप्या व समर्थांच्या मनाचे श्लोकांचा ध्वनी त्यातच सर्व कार्यकर्ते हातमोजे व मास्क लावून सोशल डिस्टनसिंग चे भान ठेवून श्रीराम नामचा व जय जय रघुवीर समर्थ च्या गजरात आलेल्या या भीक्शाफेरिचे रेशिमबागेतिल लोकांनी सहर्ष स्वागत केले व दानपात्रात धान्य, तेल, कणिक व रोख रक्कम दिले।

मंडळाचे अध्यक्ष अँड रमण सेनाड यांच्या संकल्पनेतुन ही भिक्षाफेरी काढण्यात आली यामध्ये संत गजानन महाराज श्रद्धा स्थानाचे डॉ श्रीरंग वराड़पांडे, स्वप्निल वऱ्हाडे, शैलेन्द्र गाडगे, अँड राजेन्द्र गिल्लूरकर ,भाऊ भोयर,प्रविण घुले, ओंकार सेनाड, हेमंत कुलकर्णी, अथर्व सेनाड, प्रशांत गिते, राजेश यादव, तेजस पिट्टूले, नरेश राउत, संजय काळे, श्रीनिवास देशमुख, अजय पेंड़के, गौरव क्हाडे, गौरव शाहकार, सारंग कापरे, बबन पातुरकर, बबन याटकरलेवार, निरज सिंग, भांडारकर बंधु, पद्मनाभ जोशी, चारुदत्त बानते, संदीप वाघ, शशि ठाकुर, इत्यादी अनेक कार्यकर्त्योंनी यासाठी परिश्रम घेतले. परिसरातील नागरिकांनी मंडळाच्या या कार्याला सहकार्य व प्रोत्साहन दिले तसेच प्रचंड कौतुक केले.