Published On : Sun, Jun 14th, 2020

जॉर्ज फेर्नांडीस समर्थकांनी मजदूर पक्षाची स्थापना केली

Advertisement

नागपूर: कोरोना विषाणू च्या महामारीने देशातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारने संघटीत व असंघटीत 50 करोड़ कामगारांचे भवितव्य धोक्यात आणले आहे. देशातील पोलिसांना काशमीरमध्ये ३७० कलम हटविल्या नंतर तेथील पोलिसांना जे अधिकार सरकार नी दिले होते तेच अधिकार देशातील जनतेला हटविण्या करीत पोलिसांना देण्यात आले त्यामुळे देशातील लहान मुले महिला विकलांग वृद्ध बेरोजगार असा ५ हजार वर लोकांना रस्त्यावरून पायदळ जात असतांना आणि अन्य वाहनांनी जात असतांना बेछूट पोलिसांनी लाठीचार्ज करून मारले आहे.

जॉर्ज फेर्नांडीस यांनी नेहमीच म्हटले आहे केंद्र व राज्यातील सरकारे गरिबांना गरीब बनवितात व ठराविक मोठ्यां उद्द्योगपतींना देश लुटायला मोकळीक देतात.

जॉर्ज फेर्नांडीस यांच्या विचारांने प्रेरित होऊन देशातील जॉर्ज फर्नांडिस समर्थकांनी कामगारांची राजकीय बाजू मांडण्या करिता “मजदूर पक्ष” (जॉर्ज फेर्नांडीस) स्थापन केला आहे.

या राष्ट्रीय राजकीय पक्षाची ११ सदस्यांची कमेटी नियुक्त केली आहे. त्यात शेतकरी कामगारांचे नेते श्री सुरेश कपिले यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी तर महाराष्ट्रातून नागपूर कामगारांचे नेते श्री अनिल चौहान यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.

येणाऱ्या देशातील विधानसभा निवंणुकीत नरेंद्र मोदी व त्यांच्या सोबत युती असलेल्या पक्षाच्या विरोधात संघटीत व असंघटीत फुटपाथ दुकानदार फेरीवाल्यांचा आक्रोश आहे त्या मुळे मजदूर पक्षांनीं जनतेला आव्हान केले आहे. या पक्षांना मतदान करू नये यांना सरकार बनविण्या पासून दूर ठेवावे असे प्रसिद्धित दिलेल्या पत्रकात मजदूर पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री अनिल चौहान यांनी म्हटले आहे.

बिहार मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे कि प्रवासी कामगारांना त्यांच्या गांवी पाठविण्या करीता केंद्र सरकार ने ८५% टक्के व राज्य सरकार ने १५% टक्के खर्च केले असा कुठलाहि खर्च कामगारांना गांवी पाठविण्या करीता केलेला नाही अमित शाह हे खोट बोलतात.

वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी फुटपाथ दुकानदार फेरीवाल्यां करीता ५ हजार कोटी पैकेज ची घोषणा केली होती कोणाला मिळाला नाही.
नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटीची घोषणा देशातील शेतकरी, कामगार यांना आत्मनिर्भर विकास करण्या करित शेतकरी कामगारांना हा पैसां न देता देशातील लुटेरे उद्द्योगपती गौतम अडाणी, मुकेश अंबानी रामदेव बाबा असा पन्नास लुटेरांना लाभ दिला.

देशभरातील जॉर्ज समर्थक मजदूर पक्ष (जॉर्ज फर्नांडिस) च्या मार्फत आंदोलन करतील असा खरमरित इशारा अनिल चौहान यांनी पत्रकात दिला आहे.