Published On : Thu, Mar 26th, 2020

करोना रुग्णांना पारडसिंगा संस्थाचा आधार

Advertisement

काटोल: जगात जीवघेणा संसर्ग जन्य करोना व्हरसने पछाडले आहे. आपला देश या भयानक संकटाचा सामना करीत आहे.शाशन प्रतिबंधात्मक निरनिराळे उपाय करीत आहे.वाढते रुग्ण व उपचाराला योग्य जागा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय काटोल तालुक्यातील पारडसिंगा संस्थेने घेतला

आहे. पूर्व विदर्भातील सुप्रसिध्द श्री सती अनसूया माता संस्थान येथील सुसज्ज 60 खोल्या करोना रुग्णाचे उपचाराला देण्याचा महत्वपूर्ण निर्णय संस्थानचे अध्यक्ष चरणसिंग ठाकूर यांनी घेतला. यासंबधी बोलतांना ठाकूर म्हणाले करोना संसर्गजन्य गंभीर आजारावर सुरक्षित उपचार करणे महत्वाचे आहे.ही फार समस्या अनेक समोर निर्माण झाली आहे. परिवाराला यामुळे साह्य व आधार मिळणार आहे.

झपाट्याने प्रसार होणाऱ्या करोना ची बाधा इतरांना होऊ नये याकरिता जागेची मोठी समस्या निर्माण झाली आहे.देशाचे व समाजाचे दृष्टीने महत्वाची भूमिका आज संस्थाने घेतली असून सर्व विश्वस्थ मदतीला सक्रिय झाले आहे.सामाजिक व आरोग्य विषयक कार्यात संस्थान नेहमी अग्रेसर असून यामुळे समाजाला नवं मार्ग मिळाला आहे. निवासी उपचार भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण यामुळे होणार आहे.भक्तांनी निर्णयाचे स्वागत केले आहे.

मानव सेवा हीच ईश्वर खरी ईश्वर सेवा….
गरजू व रुग्णाला वेळीच उपचार मिळाले तर त्याचे प्राण वाचू शकते. असे महान कार्य संस्थन कडून होत असल्याबद्दल मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा असा प्रत्यय आला आहे.