Published On : Mon, Feb 8th, 2021

बिनासंगम व भानेगाव पुनर्वसन मागणीला विविध स्तरावरून पाठिंबा

Advertisement

– आंदोलन चिघळण्याची शक्यता

खापरखेडा– परिसरातील भानेगाव ओपन कास्ट कोळसा खाणीसाठी शेकडो हेक्टर जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या शिवाय बिनासंमग व भानेगाव ही दोन गावे प्रभावित झाली कोळसा खाणीत दररोज होत असलेल्या ब्लास्ट मूळे प्रकल्पग्रस्त गावातील घरांना भेगा पडल्या आहेत त्यामूळे येथील नागरिक आपला जीव मुठीत घेऊन जगताहेत पुनर्वसन मागणीसाठी मागील अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे

Gold Rate
29 April 2025
Gold 24 KT 96,200/-
Gold 22 KT 89,500/-
Silver / Kg 97,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पुनर्वसन करण्याकरिता वेकोलीने ८५ कोटी व महानिर्मिती कंपनीने १२२ कोटी रुपये दिले आहेत मात्र शासनाच्या उदासीन धोरणामूळे पुनर्वसन मागणी थंडबसत्यात पडली आहे त्यामूळे आता बिनासंगम व भानेगाव वासीयांनी आर-पारची लढाई सुरू केली असून बेमुदत साखळी उपोषणाच हत्यार उपसले आहे ३ फेब्रुवारी पासून सर्व पक्षीय बेमुदत साखळी उपोषण बिनागाव पुनर्वसन संघर्ष समितीच्या वतीने सुरू करण्यात आले बेमुदत साखळी उपोषणाला विविध राजकीय, सामाजिक संघटना आपला पाठिंबा दर्शवित आहे

माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर, माजी जि.प.अध्यक्ष सुरेश भोयर, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह अनेक नेत्यांनी बेमुदत साखळी उपोषण स्थळाला भेटी दिल्या आहेत दररोज मिळणारा पाठिंबा लक्ष्यात घेता भविष्यात आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत व पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री यांनी अजूनही यासंदर्भात कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्यामूळे स्थानिक नागरिकांत नाराजीचा सूर दिसून येत आहे.

नुकताच चर्मकार समाज एकता संघटना व संत रविदास सेना युवा संघटना खापरखेडा, भानेगाव यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन बेमुदत साखळी उपोषणाला आपला पाठिंबा जाहीर केला त्वरित प्रकल्पग्रस्तांचे पुनवर्सन करण्याची मागणी शासन दरबारी केली आहे यावेळी संघटनेचे व्यवस्थापक अनेस चवरे, कार्यकारी अध्यक्ष नरेश कनोजे, संत रविदास मंदिर समितीचे अध्यक्ष दिलीप बर्वे, ग्रा प सदस्य सुभाष चांदसरोदे, उदेभान कनोजे, कैलास बर्वे, गजानन बर्वे, मुकेश चवरे, राजू मालाधारी, बबन सोनेकर, अजय बर्वे, आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement