
बारामती : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी आघाडीचा भक्कम आकडा गाठत विजयाची जोरदार वाटचाल सुरू ठेवली आहे. बाराव्या फेरीनंतर त्यांनी तब्बल १ लाख ३ हजार ७०९ मतांची आघाडी घेत विरोधकांना मोठा धक्का दिला आहे.
बाराव्या फेरीतच सुनेत्रा पवार यांना ८०५७ मतं मिळाल्याने त्यांची आघाडी अधिकच मजबूत झाली आहे. आतापर्यंत एकूण २३ फेऱ्यांपैकी १२ फेऱ्यांचे निकाल जाहीर झाले असून, या टप्प्यावरच त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
मतमोजणीची प्रक्रिया वेगाने सुरू असून, दुपारी २.३० वाजेपर्यंत सर्व फेऱ्यांचे निकाल समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, बारामतीत पवार समर्थकांकडून जल्लोषाची तयारी सुरू झाली असून, राजकीय वर्तुळात या निकालाकडे विशेष लक्ष लागले आहे.
Advertisement








