भारतीय जनता पार्टी,नागपूर शहरच्या वतीने शहराच्या धोरणात्मक विकासासाठी आणि अभ्यासू राजकारणाला गती देण्यासाठी ‘पॉलिसी अँड रिसर्च टीम’ची(PRT)घोषणा करण्यात आली असून,या टीमच्या अध्यक्षपदी सुलभ देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजप नागपूर शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी नियुक्ती पत्रक देऊन ही घोषणा केली असून.या महत्त्वपूर्ण जबाबदारीअंतर्गत सुलभ देशपांडे हे नागपूर शहराशी संबंधित धोरणात्मक विषय,संशोधनाधारित अभ्यास तसेच प्रलंबित नागरी समस्यांवर पक्षाच्या वतीने तांत्रिक आणि अभ्यासपूर्ण कार्य करतील.
या टीममध्ये सुलभ देशपांडे यांना सहकार्य करण्यासाठी प्रशांत रायपूरकर व हुजेफा धामणगाववाला यांची ‘सह-प्रभारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तर सदस्यपदी गोपी मोरघडे,श्रीकांत अर्धापुरकर, डॉ.रविकांत भारद्वाज,आर्किटेक्ट संदीप पथे,देवाशीष अग्रवाल,शुभम शुक्ला आणि हरि बाहेती या तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे.या नियुक्तीमुळे नागपूर शहराच्या प्रश्नांना एक अभ्यासपूर्ण व्यासपीठ मिळेल,असा विश्वास पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.









