Published On : Wed, Sep 22nd, 2021

पारशिवनीत महिला पोलिस शिपायाच्या पतीची आत्महत्या की हत्या ?

पारशिवनी – पारशिवनी पोलीस स्टेशनच्या वसाहतीत राहणाऱ्या महिला शिपायाच्या पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारला ( दि.20 ) उघडकीस आलेली आहे. ही आत्महत्या की हत्या आहे असा संशय सध्या पारशिवनी शहरात चर्चेचा विषय बनलेला आहे.

Advertisement

पारशिवनी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या व तिथल्याच पोलीस वसाहतीत राहणारी
मृताची पत्नी पारशिवनी पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. मृताचे नाव योगेश नत्थुजी लोखंडे (३८, पोलिस वसाहत पारशिवनी) आहे . मृताची पत्नी

Advertisement

कविता गोंडाणे लोखंडे हिने दिलेल्या तक्रारीनुसार ती सोमवारी पहाटे झोपून उठली असता , तिला योगेश दुसऱ्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. लगेच घटनेची माहिती पोलिस ठाण्यात देण्यात आली. उत्तरीय तपासणीकरिता त्याचा मृतदेह शासकीय रुग्णालय नागपूर येथे हलविण्यात आला. सध्या पारशिवनी शहरात या आत्महत्येविषयी उलटसुलट चर्चेला उधाण आलेले आहे.

Advertisement

पारशिवनी शहरात शवविच्छेदन करण्याऐवजी नागपूरला का नेण्यात आले ? पोलीस स्टेशन च्या आवारात सी.सी.टी.व्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहे. या कॅमेरातुन पडताळनी केली असता , सत्यता पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच हा तपास नागपूर ग्रामीण गुन्हे शाखेकडे सोपविले असता खरे रहस्य उलगडण्याची शक्यता असल्याचेही बोलल्या जात आहे. सदर घटनेचा तपास पारशिवनीचे पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक संदीपान उबाडे करीत आहे.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement