कन्हान: – नागपुर वरून दुचाकीने आलेले युवक व युवती यांचा टेकाडी बस स्टाप जवळील चारपदरी उडाण पुलावर भांडण होऊन युवतीची पुलावरून उडी मारून आत्महत्या की हत्या ?
सोमवार (दि.३) मे ला सायंकाळी ४.१५ ते ४.४५ वाजता दरम्यान नागपुर वरून आलेल्या फिर्यादी जब्बार मोबीन खान वय २३ वर्ष रा. हसनबाग चॉंदनी चौक नागपुर व ममता प्रकाश बोराडे वय २८ वर्ष रा. मुन्शी गल्ली गौराबाई मठावर महाल नागपुर हे दोघेही नागपुर वरून एँक्टीव्हा दुचाकी क्र एमएच ४९ ए बी ७१८७ ने येऊन टेकाडी बस स्टाप जवळील चारपदरी उडाणपुलावर थाबले असता दोघात भांडण होऊन युवती ममता बोराडे हीने पुलावरून खाली उडी मार ल्याने गंभीर जख्मी झाली.
कन्हान पोलीसांना माहीती मिळताच घटनास्थळी पोहचुन युवती गंभीर जख्मी असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे उपचा रार्थ नेले असता तिची परिस्थिती गंभीर असल्याने डॉक्टरांनी नागपुर ला रवाना केले असता मेडीकल रूग्णालय नागपुर ला तिचा उपरारा दरम्यान मुत्यु झाला. टेकाडी चारपदरी उडाण पुलावरून उडी घेऊन मुलीची आत्महत्या की हत्या ? अश परिसरातील नागरिकात चर्चा आहे.
कन्हान पोलीस स्टेशनते परी. पो उपअधिक्षक कन्हान थाने दार सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात पो.सहा.निरिक्षक जावेद शेख हयानी मर्ग १७४ दाखल करून पुढील तपास करित आहे.