Published On : Fri, Nov 1st, 2019

विवाहित तरुणाची गळफास लावून आत्महत्या

कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या खलाशी नगर रहिवासी एका 35 वर्षीय विवाहित तरुणाने अज्ञात कारणावरून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी 5 च्या दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव विशाल हरीश भौतकर असे आहे.

प्राप्त माहितीनुसार सदर मृतक तरुणाचे नागपूर येथील हुडकेश्वर येथे मोबाईल चे दुकान असून हे दुकान दोन्ही पती- पत्नी सांभाळायचे . काल दुपारी जेवणाच्या वेळेत मृतक जेवायला जाण्याच्या बहाण्याने तेथिल राहत्या खोलीत गेला मात्र बराच वेळ होऊन दुकानात न परतल्याने शंका वळवत पत्नी ने घरी भेट दिली असता मृतक पती ने गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना निदर्शनास येताच एकच धक्का बसला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसानी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामाँ करीत मृतदेह ताब्यात घेऊन मृतकाच्या पार्थिवावर संबंधित शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून कामठी येथील राणी तलाव मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.पोलिसानी यासंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी आत्महत्येचे मूळ कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.मृतकाच्या पाठीमागे पत्नी, सहा वर्षाची मुलगी , यासह बराच मोठा आप्तपरिवार आहे