नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेशाचे वारे वाहू लागले आहेत. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसचा बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या दाव्याने काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली.
मी नाव घेत नाही, पण उद्या काँग्रेसचा अतिशय मोठा नेता आमच्या पक्षात आला, तर त्याच्या अनुभवाचा फायदाच होईल ना? असे सूचक विधान करत खूप जण येणार आहेत, असे मुनगंटीवार म्हणाले.
दुसऱ्या पक्षातील लोक आपल्या पक्षात आले तर शेवटी आपणच मोठे होतो. त्यामुळे मला वाटते की,हा प्रश्नच राहत नाही की, तुम्हाला काय गरज राहते? मी नाव घेत नाही, पण उद्या काँग्रेसचा अतिशय मोठा नेता आमच्या पक्षात आला, तर त्याच्या अनुभवाचा फायदाच होईल ना? शेवटी प्रत्येकामध्ये काही गुण तर नक्कीच आहेत. आगामी काळात भाजपामध्ये विरोधी पक्षातील अनेक नेते पक्षप्रवेश करणार आहेत, असे मुनगंटीवार म्हणाले.