Published On : Sat, Jun 19th, 2021

भारतीय जनता युवा मोर्चाच्या मागण्यांना यश..!

Advertisement

भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर महानगराने भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रविण दटके, माजी महापौर संदिप जोशी, शिक्षण मंचाच्या अध्यक्ष कल्पना पांडे यांच्या नेतृत्वामध्ये काही दिवसांपुर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठाला निवेदन देण्यात आले होते.

त्यामधील प्रमुख मागण्या ह्या सोबत जोडलेल्या निवेदनात मांडल्या आहेत. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू यांच्या सोबत सविस्तर चर्चा केल्या नंतर मागील आठवड्यामध्ये परीक्षा शुल्कासंदर्भात जो निर्णय घेऊन मागण्या सोडवण्यात आल्या व काल विद्यापीठातर्फे विद्यार्थांकरता जीवन विमा आणि अपघात विमा लागु करण्यात आला यामुळे जवळपास ४ लाख विद्यार्थ्यांना प्रत्यक्षरित्या लाभ मिळणार आहे.

आम्ही भाजयुमोतर्फे विद्यापीठाचे खुप खुप धन्यवाद करतो की त्यांनी विद्यार्थांच्या प्रश्नांना युवा मोर्चानी जी वाचा फोडली त्याला समाधानकारक न्याय मिळऊन दिला. यानंतर ही विद्यार्थ्यांच्या काही मागण्या किंव्हा प्रश्न असतील त्यासाठी संघर्ष करायला युवा मोर्चा नेहमी तत्पर असेल. पुनश्य एकदा आम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरु व सर्व व्यवस्थापन समिती सदस्य यांचे आभार मानतो की त्यांनी विद्यार्थ्यांच्या हितार्थ निर्णय घेऊन लाखो विद्यार्थ्यांना दिलासा दिला.

आजच्या पत्रकार परिषदेला प्रामुख्याने भाजयुमो प्रदेश सचिव कल्याण देशपांडे हे उपस्थित होते. सोबत भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले, महामंत्री सचिन करारे, दिपांशु लिंगायत, अमोल तिडके, विद्यार्थी आघाडी संयोजक संकेत कुकडे, सहसंयोजक गौरव हरडे उपस्थित होते.