Published On : Sat, Jun 19th, 2021

सीएसआर निधीतून ना. गडकरी यांच्या हस्ते 8 अ‍ॅम्ब्युलन्स

Advertisement

विविध सामाजिक संस्थांना वितरित

नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सीएसआर निधीतून 8 सामाजिक संस्थांना सर्व सुविधांनी सुसज्जित अशा 8 अ‍ॅम्ब्युलन्स वितरित केल्या. याप्रसंगी अंजनगाव सुर्जीच्या मठाचे जितेंद्रनाथ महाराज प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement

या अ‍ॅम्ब्युलन्स 8 एमजी हेक्टर या कंपनीच्या आहेत. या संस्थांची नावे- वनवासी सेवा समिती यांना एकलव्यय आश्रम शाळा जामोद, जळगाव जामोद, डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती अकोला, संस्कृती संवर्धन मंडळ अवधूतवाडी यवतमाळ, लोकमंगल फाऊंडेशन, जनजाती चेतना समिती गोंदिया, जनजाती विकास समिती गडचिरोली, भटके विमुक्त कल्याणकारी संस्था भंडारा, मिशन फॉर डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड डिव्हिनिटी ट्रस्ट नागपूर. या संस्थांच्या पदाधिकार्‍यांच्या स्वाधीन ना. गडकरी यांच्या हस्ते अ‍ॅम्ब्युलन्सच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. याप्रसंगी सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement