Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Oct 29th, 2019

  आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून अडीच हजार मेंढ्यांना वाचवण्यात यश

  दिनांक 26 ऑक्टोंबरला रात्री मौजा सुकंरअल्ली, ता. सिरोंचा येथील गोदावरी नदीच्या विस्तृत पात्रात सुमारे 2500 मेंढ्या-बकऱ्या 6 मेंढपाळ चारही बाजूने पाणी वाढल्याने अडकले होते. यानंतर आपत्ती व्यवस्थापनाच्या मध्यस्थीने २८ ऑक्टोंबर रोजी सर्व मेंढया व मेंढपाळांना सुखरूप बाहेर काढले.
  याबाबत मदतीसाठी संबंधित मेंढपाळांच्या नातेवाईकांकडून व प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन, गडचिरोली कक्षाल दि. 27 रोजी सकाळी 9 ला माहिती मिळाली. स्थानिक महसूल, पोलीस प्रशासनाने सुसमन्वय साधत दि. 28 ऑक्टोबरच्या सकाळी सर्व जनावरे व 6 मनुष्य यांना सुखरूप बाहेर काढले.

  दि. 27 ऑक्टोबरला स्पॉटवर टीम ने भेट दिली पण मेंढपाळ मेंढ्यांना सोडून यायला तयार नव्हते, अशावेळेस त्यांच्याकडे पुरेसे राशन असल्याची खात्री करून लाईफ जॅकेट्स देण्यात आले व नदीकिनारी रबर बोट व पथक तयार ठेवण्यात आले.

  रात्रौ मेडिगड्डा चे वरील भागातील श्रीरामसागर व येलमपल्ली धरणातील पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने चिंताजनक स्थिती होती परंतु जिल्हा प्रशासन-स्थानिक प्रशासन-मेडिगड्डा प्रकल्प यांच्यातील सुसमन्वयामुळे सदर कार्यवाही 48 तासानंतर सुखरूप पार पाडली.

  यात सुधाकर कुळमेथे अप्पर जिल्हाधिकारी, गोरख गायकवाड पोलीस उपअधीक्षक, स्वामी उपविभागीय पोलीस अधिकारी, सिरोंचा, रमेश जसवंत तहसिलदार सिरोंचा
  कार्यकारी अभियंता मेडिगड्डा, सपोनि दराडे प्रभारी पोस्टे आसरअल्ली, हमीद सय्यद नायब तहसिलदार, तलाठी खान, तलाठी मुन व इतर पोलीस व महसूल कर्मचारी इत्यादी अधिकारी व कर्मचारी यांनी महत्वाची भूमिका बजावली.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145