Published On : Mon, Mar 9th, 2020

दिल्ली पॅटर्न च्या धर्तीवर जिल्हा परिषद शाळांची निवड करण्यासंदर्भात निवेदन सादर

Advertisement

प्रत्येक तालुक्यातील 2 जी प शाळांची निवड करा-अनिल निधान

कामठी :- दिल्ली सरकारच्या माध्यमातून सरकारने शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी जिल्हा परिषद शाळामध्ये विविध आधुनिक पद्धतीच्या महत्वपूर्ण असलेल्या सोयी सुविधा पुरवून जी प शाळा मॉडर्न केल्या तर याच दिल्ली पॅटर्न च्या धर्तीवर नागपूर जिल्हा परिषद शाळा ह्या मॉडर्न करण्याचा संकल्प जिल्हा परिषद ने घेतला असुन जिल्ह्यातून 40 शाळांची निवड करण्यात आली आहे त्यात नागपूर शहरातील 20 तर नागपूर जिलह्यातील 20 शाळांची निवड करण्यात आली निवड झालेल्या जी प शाळेत 24 तास विजेची सोय, स्मार्ट क्लासरूम, व्हिडीओ कॉन्फरसिंग एज्युकेशन, विद्यार्थ्यांच्या अंतर्गत कौशल्य विकासासह स्विमिंगपुल, सर्व क्रीडा खेळाची साधने, आदी सुविधा पुरविण्यात येणार आहेत मात्र निवड झालेल्या 40 शाळेची निवड ही संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने केली असून शाळा निवडताना एकाच तालुक्याचा विचार करण्यात आला वास्तविकता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून 2 जिल्हा परिषद शाळा घेणे अपेक्षित होते मात्र तसे झाले नाही तेव्हा शैक्षणिक दृष्टिकोनातून तालुक्यातील किमान 2 जी प शाळांची निवड करण्यात यावी या मागणीसाठी नागपूर जिल्हा परिषद चे विरोधी पक्ष नेते व जी प सदस्य अणिल निधान यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मीताई बर्वे यांना सामूहिक निवेदन सादर केले.

संदीप कांबळे कामठी