Published On : Fri, Jun 26th, 2020

वारेगावातील अवैध दारू विक्रेत्या विरोधात पोलीस स्टेशन ला निवेदन सादर

कामठी :-कामठी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या वारेगाव येथे अवैध व्यवसायाला उधाण आले असून या गावात सुरू असलेल्या जुगार अड्डे तसेच अवैध दारू दुकाना मुळे येथील तरुण वर्ग ह्या अवैध धंद्याला बळी पडल्याने यांचे उज्वल भविष्य उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत तसेच कित्येकांचे कुटुंब हे नैराश्येच्या खाईत गेले आहेत तसेच गावात सुरू असलेल्या राजेश गाडेकर, राहुल लांजेवार, महेश मेश्राम, शेषराव गोंडाळे, शुक्र गोंडाळे, बाबूं गोंडाळे यांचे अवैध दारू दुकाने बिनधास्त पणे सुरु आहेत तसेच पोलिसांचा कुठलाही अभयपणा नसल्याने गावातील अवैध धंद्याला विरोध करणाऱ्या महिलांना या अवैध व्यावसायिका कडून धमकविणे , अश्लील शिवीगाळ देणे तसेच जीवे मारण्याची धमकी देणे हे नित्याचेच झाले आहे तेव्हा हे अवैध धंदे बंद व्हावे यासाठी वारेगाव येथील आम्रपाली बहुउद्देशोय महिला व ग्रामीण उद्धार संस्था च्या वतीने खापरखेडा पोलीस स्टेशन ला सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.

निवेदन देताना अध्यक्ष शिलाबाई मेश्राम, सचिव कुंदाताई चनकापुरे, संतोषी वरखंडे, अनिता गोंडाळे, फुलनबाई खाडेकर, प्रिया गाडेकर, चांद्रकुमारो यादव, कमलाबाई , लिलाबाई सुरबांदे यासह आदी महिला व पुरुष वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते

संदीप कांबळे कामठी