Published On : Sat, Nov 16th, 2019

पीक विमा कंपनीच्या असहकार्याबाबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तहसीलदार ला सामूहिक निवेदन सादर

Advertisement

कामठी :-नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसामुळे धानपिकाचे अतोनात नुकसान झाले असून मागील दोन दिवसात धनपिक हे जमिनीवर आले आहे यामध्ये ऐन पीक निघण्याच्या वेळी हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून गेल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.अशा परिस्थीतीत शेतीसाठी काढलेल्या बँकेच्या कर्जाची परतफेड कशी करणार यासाठी शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे .

कामठी तालुक्यात येणाऱ्या नेरी उनगाव गावातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजना काढला असून ज्याची यादी सेंट्रल बँक ऑफ इंडिया गुंमथळा व पंजाब नॅशनल बँक कापसी येथे उपलब्ध आहे. तेव्हा काढलेल्या या पीक विम्याचा नुकसानग्रस्त कर्जबाजारी शेतकऱ्यांना आधार व्हावा यासाठी बजाज एलयांस इंशुरेन्स कंपनीचा काढलेल्या बँक प्रतिनिधी नि नेरी उनगाव भागातील नुकसानग्रस्त शेती परिस्थितीची पाहनो करून नुकसानग्रस्त पिकाचे सर्वेक्षण करावे यासाठी कृषी विभागाच्या पायऱ्या उंबरठ्या झिजवाव्या लागत आहे त्यातच विमा कंपनीचा प्रतिनिधी कुठलाही प्रतिसाद देत नसून अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे तेव्हा सदर विमा कंपनीच्या चमूने सर्वेक्षण करून नुकसांनग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी या मागणीसाठी नेरी -उनगाव ग्रामपंचायत च्या ग्रामस्थांच्या वतीने तहसिलदार अरविंद हिंगे यांना सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.

याप्रसंगी माजी आमदार देवराव रडके,नेरी ग्रा प चे माजी सरपंच डुंमदेव नाटकर, विद्यमान सरपंच अरुण आखरे,मुरलीधर झोड,राजहंस वंजारी, कैलास वंजारी, उमेश वंजारी, भोजराज झोड, देवराव ।चकोले, सोपान वंजारी, कुसुम पाटील, राधेश्याम पाटील, देविदास झोड, रमेश झोड, शरद वाघमारे, लक्ष्मण नाटकर, धर्मराज चकोले, मंगेश चकोले, अंकुश नाटकर, चंद्रशेखर नाटकर, हरिभाऊ चकोले, रामभाऊ चकोले, काशीनाथ ठोबरे, पंढरी वानखेडे आदी उपस्थित होते

संदीप कांबळे कामठी