Published On : Sat, Feb 21st, 2026
By Nagpur Today Nagpur News

हिमाचलमध्ये दरड कोसळून सुभेदार नेतराम कटरे शहीद; गोंदियातील सालेकसा तालुक्यात शोककळा

Advertisement

गोंदिया : हिमाचल प्रदेशातील दुर्गम भागात कर्तव्य बजावत असताना दरड कोसळून झालेल्या भीषण अपघातात गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील सुकाटोला (पिपरिया) येथील रहिवासी सुभेदार नेतराम हेमराज कटरे यांना वीरमरण आले. ही हृदयद्रावक घटना १९ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे १ वाजता सुमडो परिसरात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सुभेदार कटरे हे भारतीय लष्कराच्या ८६३ इंजिनिअर वर्क्स सेक्शनमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते. १९ फेब्रुवारी रोजी ते युनिटच्या कामाच्या पाहणीसाठी झाकरी येथून सुमडोकडे जात असताना कालीधांग परिसरातील जनरल एरियामध्ये त्यांच्या वाहनावर डोंगरावरून मोठा दगड कोसळला. दगड थेट त्यांच्या बाजूला आदळल्याने डोक्याला व खांद्याला गंभीर दुखापत झाली.

Gold Rate
July 23 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,900 /-
Gold 22 KT ₹ 1,35,400 /-
Silver/Kg ₹ 2,27,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यांना तातडीने डोग्रा स्काउट्सच्या वैद्यकीय कक्षात हलविण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच दुपारी ३.५० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

शहीद सुभेदार कटरे यांच्या पश्चात वडील हेमराज, आई सरस्वता, पत्नी कविता (पोलीस शिपाई), एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने गोंदिया जिल्ह्यासह सालेकसा तालुक्यात शोककळा पसरली आहे.

Advertisement

मूळगावी आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
सुभेदार कटरे यांचे पार्थिव सिमला येथे होते. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ९ वाजता विशेष विमानाने दिल्लीहून नागपूर विमानतळावर आणण्यात येणार आहे. तेथे गाईस रेजिमेंटल सेंटर, कामठी यांच्या वतीने लष्करी मानवंदना दिली जाईल. त्यानंतर पार्थिव सुकाटोला येथे नेण्यात येऊन संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दरम्यान, हरिणखेडे पेट्रोल पंपाजवळून दुपारी १ वाजता अंत्ययात्रा निघणार असून, शहीद जवानाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पोवार समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पवार प्रगतिशील मंचतर्फे करण्यात आले आहे.
देशसेवेत प्राण अर्पण करणाऱ्या या वीर जवानाच्या बलिदानाला संपूर्ण जिल्हा सलाम करत आहे.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

विरोध या अपशब्द? लोकतंत्र में मर्यादा की सीमा क्या है? | Nagpur Today

विरोध या अपशब्द? लोकतंत्र में मर्यादा की सीमा क्या है? | Nagpur...

Nagpur : सड़क में गड्ढे या गड्ढों में सड़क?  जनता त्रस्त! जिम्मेदार कौन?

Nagpur : सड़क में गड्ढे या गड्ढों में सड़क? जनता त्रस्त! जिम्मेदार...

संविधान चौक पर युवाओं का महासैलाब! कई समर्थक हिरासत में, लेकिन जोश बरकरार!

संविधान चौक पर युवाओं का महासैलाब! कई समर्थक हिरासत में, लेकिन जोश...

NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | #topnews #maharashtranews #vidarbhanews  #nagpurnews #news

NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | #topnews #maharashtranews #vidarbhanews #nagpurnews...

शादी का झांसा देकर दुष्कर्म का आरोप #NagpurNews #CrimeNews #PoliceAction #LatestNews #NewsUpdate

शादी का झांसा देकर दुष्कर्म का आरोप #NagpurNews #CrimeNews #PoliceAction #LatestNews #NewsUpdate

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges